ऑटोमोबाईल

आली रे आली नवीन पल्सर आली! बजाजने लॉन्च केली ‘बजाज पल्सर N250’; वाचा या पावरफुल बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत

Published by
Ajay Patil

बजाज ऑटो ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी निर्मितीमध्ये खूप लोकप्रिय असून या कंपनीच्या अनेक बाईक या भारतामध्ये ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस उतरलेले आपल्याला दिसून येतात. गेल्या कित्येक वर्षापासून बजाज कंपनीने अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक बाईक मॉडेल्स लॉन्च केलेली आहेत.

त्यामध्ये बजाजचे पल्सर ही थेट शेतकऱ्यांपासून तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत लोकप्रिय अशी बाईक आहे. याच पल्सरचे आता लाईनअप बाईक पल्सर  N250 लाँच केली असून ती २४९.०७ सीसी इंजिन असलेली बजाज कंपनीचे सर्वात पावरफुल बाईक आहे.

 बजाजने लॉन्च केलीपल्सर N250’

बजाज ऑटोने लोकप्रिय पल्सर आता लाईनअप बाईक पल्सर N250 लॉन्च केली असून ही 249.07cc इंजिन असलेली आतापर्यंतचे कंपनीचे सर्वात पावरफुल बाईक आहे. तसेच या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रथमच ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देण्यात आलेली आहे. जी सेंसरच्या साह्याने व्हील स्पीड आणि इंजिन पावरचे निरीक्षण करते आणि चाक फिरवल्यास ब्रेक अप्लाय करते.

 काय आहेत या बाईकची वैशिष्ट्ये?

तसेच बजाजने या पल्सर N250 बाईक मध्ये अनेक हार्डवेअर व फीचर्समध्ये काही बदल केलेले आहेत. जसे की या बाईकच्या फ्रंट सस्पेन्शन सिस्टममध्ये बदल करण्यात आला असून या बाईकमध्ये ट्वीन एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एलइडी डीआरएल देण्यात आलेले आहेत.

तसेच कंपनीने भारतीय बाजारामध्ये ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले असून ते तीन रंग म्हणजे ब्रुकलीन ब्लॅक, ग्लॉसी रेसिंग रेड आणि पर्ल मेटालिक व्हाईट हे आहेत. याशिवाय कंपनीने या बाईक मध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, ट्रॅक्शन कंट्रोल आणि एबीएसचे नवीन राईड मोड जसे की रेन,

रोड आणि ऑन/ऑफ मिळतात. तसेच या बाईकमध्ये सस्पेन्शन करिता समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक युनिटच्या जागी युएसडी फोर्क्स देखील दिले आहेत. त्यासोबत मागच्या बाजूला समान प्रीलोड ऍडजेस्टेबल मोनोशोक युनिट देण्यात आली आहे.

 या पल्सर N250 चे इंजिन स्पेसिफिकेशन कसे आहे?

या नवीन पल्सरला 249.07cc, चार स्ट्रोक, 2 वाल्व ऑइल कुल्ड इंजिन मिळेल व ते 24.1 एचपीची कमाल पावर आणि 21.5 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या बाईकचे इंजिन पाच स्पीड गिअर बॉक्स सहज ट्यून केलेले आहे.

 किती आहे पल्सर N250 ची किंमत?

बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर लाईनअप ‘ पल्सर N250’ ही 1 लाख 51 हजार( एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे.

Ajay Patil