ऑटोमोबाईल

चार रंगांमध्ये देशात अवतरली पल्सर! मार्केटमध्ये करेल धुमाकूळ,वाचा या नवीन पल्सरची वैशिष्ट्ये आणि किंमत

Published by
Ajay Patil

देशामध्ये जर आपण महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध असलेल्या दुचाकी उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बजाज ही कंपनी लोकप्रिय आणि तितकीच प्रसिद्ध देखील आहे. कारण या कंपनीने आतापर्यंत ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा अनेक बाईक मॉडेल बाजारात आणलेले आहेत व ग्राहकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देखील दिलेला आहे.

बजाज कंपनीच्या माध्यमातून ज्या काही जुन्या बाईक आहेत त्यांना अपडेट केले जात असून अशा बाईक बाजारपेठेत उतरवल्या जात आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण सगळ्यांमध्ये आवडते असलेली बजाजची बाईक पाहिली तर ती म्हणजे पल्सर होय. गेल्या कित्येक वर्षापासून बजाजच्या पल्सरने ग्राहकांमध्ये पसंती व लोकप्रियता मिळवलेली आहे

व याच पल्सरचे अपडेटेड मॉडेल आता बजाज ऑटोने बाजारपेठेत लॉन्च केले असून त्याचे नाव आहे पल्सर N160 हे होय. एडिशन लेटेस्ट असून पल्सर लाईन अप मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांसाठी सादर करण्यात आलेली आहे. जर आपण या नवीन पल्सर N160 मधील सर्वात मोठे अपडेट पाहिले तर त्याचे फ्रंट युएसडी फोर्क्स आहेत. यामुळे या नवीन बाईकचे सस्पेन्शन कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

 काय आहेत नवीन पल्सर N160 ची वैशिष्ट्ये?

या नवीन पल्सर मध्ये एक ब्लूटूथ सक्षम इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील देण्यात आला असून जो टर्न बाय टर्न नेवीगेशनच्या सुविधेसह येतो. त्याच्या नवीन पल्सर मध्ये रोड, रेन आणि ऑफरोड असे तीन एबीएस मोड देण्यात आलेले आहेत व या बाईकमध्ये एबीएस मोड पूर्णपणे बंद करता येत नाही. एबीएस केवळ मोडनुसार अड्जस्ट केले जाऊ शकते.

तसेच ही बाईक चार रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून यामध्ये लाल, निळा तसेच पांढरा आणि काळा रंगांचा समावेश करण्यात आलेला आहे. या बाईकचे इंजिन हे 164.82cc सिंगल सिलेंडर, ऑइल कुल्ड इंजिन वापरले गेले असून जे 16 एचपी पावर आणि 14.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

तसेच ब्रेकिंग करिता या बाईकला स्टॅंडर्ड चॅनेल एबीएस सोबत दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आलेली आहे. या नवीन पल्सर चे वैशिष्ट्य म्हणजे ही बाजारात एकमेव अशी बाईक आहे जी 160cc बाईक असून ड्युअल चॅनल एबीएससह येते.

 किती आहे या नवीन पल्सरची किंमत?

ही नवीन पल्सर N160 नवीन मॉडेल त्याच्या जुन्या प्रकारापेक्षा सहा हजार रुपयांनी महाग असून या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख 40 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.

Ajay Patil