Bajaj Chetak Electric : बजाज स्कूटर प्रेमींसाठी आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 22,000 रुपयांनी केली कमी, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Chetak Electric : वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मार्केटचा विचार करता आता इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्याही आपल्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी बजाजने आपली बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. जिची किंमत आता कंपनीनेच 22,000 रुपयांनी कमी केली आहे. जर तुम्ही स्कुटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. जाणून घ्या फीचर्स आणि रेंज.

जाणून घ्या फीचर्स

बजाज या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 3 kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. जी 3.8 kW इलेक्ट्रिक मोटरशी जोडण्यात आली आहे. जी जास्तीत जास्त 5.5 पीएस पॉवर निर्माण करेल. हे इको मोडमध्ये कमाल 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीची दमदार रेंज देत आहे. तर 5 Amp आउटलेट द्वारे स्कुटरची बॅटरी 100% चार्ज होण्यासाठी अंदाजे 5 तासांचा अवधी लागतो.

स्कुटरच्या या दोन्ही टोकांना 12-इंच अलॉय व्हील्स दिली आहेत. याच्या पुढील बाजूला 90/90 टायर आणि मागच्या बाजूस 90/100 टायर (दोन्ही ट्यूबलेस) मिळत आहेत. याच्या फ्रंट-व्हीलला लीडिंग-लिंक-प्रकारचे सस्पेन्शन मिळत आहे तर मागील चाकाला मोनोशॉक सस्पेन्शन मिळत आहे. इतकेच नाही तर या स्कूटरला रिव्हर्स गियर मिळत आहे.

कंपनीच्या या धमाकेदार स्कूटरला रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह ऑल-एलईडी लाइट्स (हेडलॅम्प, डीआरएल, टर्न इंडिकेटर, टेललाइट्स), फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह) मिळत आहेत. एवढेच नाही तर कंपनीकडून बॅटरीवर 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देण्यात येत ​​आहे.

लवकरच लाँच होणार ई-स्कूटर

अशातच आता ही कंपनी आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनी प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरवर काम करत आहे. जे स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह लॉन्च करण्यात येईल. सध्या कंपनीकडे फक्त एकच मॉडेल बजाज चेतक इलेक्ट्रिक असून आताचे नवीन स्वॅप करण्यायोग्य बॅटरी ई-स्कूटर चेतक इलेक्ट्रिकचे एक प्रकार असण्याची शक्यता आहे.