Bajaj New Electric Scooter : ओला आणि Ather ला टक्कर देण्यासाठी लाँच होणार बजाजची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj New Electric Scooter : देशात इंधनाच्या किमती वाढल्यापासून इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर झपाट्याने वाढला आहे. मार्केटची गरज लक्षात घेता अनेक कंपन्या आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू लागल्या आहेत.

नुकतीच ओला आणि Ather ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या दोन्ही कंपनींमध्ये टक्कर पाहायला मिळत आहेत. अशातच आता बजाज आपली लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

किती आहे किंमत आणि रेंज?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात घ्या की अजूनही बजाज ऑटोने त्याच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल कोणतीही माहिती जाहीर केली नाही, परंतु बजाज ब्लेड (संभाव्य नाव) अनेक वेळा स्पॉट करण्यात आली आहे. कंपनी आपली नवीन स्कुटर आगामी सणासुदीच्या काळात लॉन्च करण्याची शक्यता आहे, असे मानले जात आहे.

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, बजाजच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक मोठा बॅटरी पॅक आणि सर्वात जास्त शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर असू शकते, ज्यात Ather आणि Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा जास्त पॉवर, चांगली बॅटरी रेंज आणि वेग क्षमता कंपनीच्या ग्राहकांना मिळू शकते.

सर्वात आनंदाची बाब म्हणजे या बजाज इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक आणि फीचर्स सध्याच्या चेतक इलेक्ट्रिकपेक्षा खूप चांगली असण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्विन हेडलॅम्प सेटअप तसेच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक जबरदस्त फीचर्स असू शकतात.

या कंपन्या लाँच करणार इलेक्ट्रिक टू-व्हीलर

भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या काळात होंडा, सुझुकी, यामाहासह इतर कंपन्या त्यांच्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारी करत आहेत. अशातच आता Ather Energy पुढील आठवड्यात आपल्या नवीन स्कूटरची किंमत जाहीर करेल. तर TVS मोटर कंपनी आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

बजाज ऑटोने त्याच्या आगामी उत्पादनांसाठी अनेक नावे ट्रेडमार्क केली असून त्यापैकी काही EV विभागातील आहेत. बजाज ऑटोने प्रत्येक वर्षी एक इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याची योजना केली असून बजाजच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जास्त डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळात समजतील.