ऑटोमोबाईल

पल्सरच्या चाहत्यांसाठी गुड न्युज आली…! बजाज ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च करणार नवीन पल्सर, फिचर्स अन किंमत किती राहणार ?

Published by
Tejas B Shelar

Bajaj Pulsar 2024 : बजाज ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. बजाज कंपनीच्या अनेक टू व्हीलर तुम्हाला पाहायला मिळतील. टू व्हीलर सेगमेंट मध्ये भारतातील एक प्रतिष्ठित आणि मोठी कंपनी म्हणून बजाजची ओळख आहे. ग्लोबली देखील बजाज कंपनीचा एक मोठा चाहता वर्ग पाहायाला मिळतो. बजाज कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत मात्र यातील पल्सर ही सर्वात जास्त विकली जाणारी आणि सर्वात लोकप्रिय मोटरसायकल आहे.

बजाज पल्सरची क्रेज गावांपासून ते शहरांपर्यंत सर्वत्र पाहायला मिळते. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग बजाज पल्सर सहजतेने रस्त्यावर नजरेस पडते. यावरून या गाडीची लोकप्रियता किती अधिक आहे हे आपल्या लक्षात येते.

कंपनीने या गाडीची लोकप्रियता पाहता अलीकडेच Pulsar NS400Z लाँच केली आहे, जी आजपर्यंतची सर्वात शक्तिशाली पल्सर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाही तर इंजिनच्या बाबतीत ही देशातील सर्वात स्वस्त मोटरसायकल सुद्धा बनली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

पल्सरच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी नवीन कम्युटर बाइकची चाचणी करत आहे. ही नवीन बाईक Pulsar N125 असू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. विशेष म्हणजे ही नवीन पल्सर ऑक्टोबरमध्ये लॉन्च होईल अशी आशा देखील व्यक्त होत आहे.

Bajaj Pulsar N125 चे काही फोटो समोर आले आहेत. यात Pulsar N150 सारखीचं या गाडीची देखील रचना पाहायला मिळतं आहे. मोटरसायकलमध्ये 17-इंच अलॉय व्हील दिसत आहेत. प्रोजेक्टर एलईडी हेडलाइटऐवजी मल्टी रिफ्लेक्टर एलईडी युनिट दिले जाणार आहे.

इंधन टाकीवरील तीव्र विस्तार आणि अपस्वेप्ट टेल विभाग एक स्पोर्टी लुक देत आहे. या बाईकमध्ये सस्पेंशनसाठी समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट उपलब्ध राहणार आहे. ब्रेकिंगसाठी, डिस्क ब्रेक समोर आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक असणार आहे.

या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीत 124.45cc एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल, जे 5-स्पीड गिअरबॉक्ससह 11.9PS पॉवर आणि 11Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम राहणार आहे. या मोटरसायकलमध्ये राइडरसाठी मागील-सेट फूटपेग आणि एक उंच आणि रुंद हँडलबार राहणार आहे.

यात एलईडी दिवे, टू-पीस ग्रॅब्रेलसह स्प्लिट सीट आणि नेव्हिगेशन फंक्शनशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळणार आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही नव्याने लॉन्च होणारी पल्सर सुमारे 1 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीसह भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com