ऑटोमोबाईल

‘या’ तारखेला देशात येणार जगातील पहिली सीएनजी बाईक! वाचा या बाईकची किंमत तसेच इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

भारतामध्ये अनेक बाईक उत्पादक कंपनी असून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक या कंपन्यांकडून उत्पादित केले जातात. भारतामध्ये असलेल्या प्रमुख बाईक उत्पादक कंपन्यांमध्ये बजाज ऑटो हे नाव खूप प्रसिद्ध आहे व या कंपनीचे सर्व प्रकारचे वाहने ग्राहकांमध्ये देखील विशेष लोकप्रिय आहेत. आजपर्यंत बजाजने अनेक प्रकारचे बाईक्स बाजारपेठेत आणले असून आता याही पुढे पाऊल टाकत आता बजाजच्या माध्यमातून देशातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली जाणार आहे.

या कंपनीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून सीएनजी बाईकवर काम सुरू आहे व गेल्या वर्षभरात या बाईकची चाचणी अनेक वेळा करण्यात आलेली आहे. लवकरच आता ही बाईक ग्राहकांच्या सेवेची सादर होणार आहे.

 बजाज लॉन्च करणार देशातील पहिली सीएनजी बाईक

बजाजच्या माध्यमातून दीर्घ काळापासून सीएनजी बाईकवर काम सुरू आहे व गेल्या वर्षभरामध्ये या बाईकच्या अनेक चाचण्या घेण्यात आलेले आहेत. बजाज हे सीएनजी बाईक पाच जुलै 2024 रोजी लॉन्च करण्याच्या तयारीत असून देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात या बजाजच्या सीएनजी बाईकचे अनावरण होणार आहे.

नेमके या सीएनजी बाईकचे नाव काय असणार याबाबत कुठलीही माहिती नाही. परंतु चाकण आधारित एका बाईक निर्मात्याने दिलेल्या माहितीनुसार या बाईकला ब्रूझर म्हटले जाऊ शकते असे म्हटले आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांसोबत आता ही सीएनजी बाईक खूप मोलाची भूमिका पार पाडणार आहे.

 या बाईक मध्ये काय असू शकतात वैशिष्ट्ये?

साधारणपणे ही सीएनजी बाईक डबल कॅडल फ्रेम वर आधारित असेल व त्यात स्लोपर इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन कसे असेल याबाबत कुठलेही माहिती समोर आलेली नाही. परंतु 110 ते 150cc इंजिन असण्याची अपेक्षा आहे. तसेच या नवीन सीएनजी बाईक मध्ये 125cc इंजिन असेल जे पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्हींवर चालू शकेल.

तसेच जास्तीची रेंज मिळावी आणि सीएनजी गॅस संपल्यास बॅकअप म्हणून काम करण्यासाठी या बाईकमध्ये एक लहानशी पेट्रोल टाकी देखील देण्यात आली आहे. किमती बद्दल जे ग्राहक जागरूक असतात अशा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही बाईक डिझाईन केले असल्याचा दावा बजाज कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच कंपनीने म्हटले आहे की ही येऊ घातलेली सीएनजी बाईक ऑपरेटिंग आणि इंधन खर्च 50 ते 65 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम असेल.

Ajay Patil