ऑटोमोबाईल

इलेक्ट्रिक स्कूटरचे मार्केट गाजवायला आली बजाजची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर! एका चार्जवर धावेल 136 किमी,वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

अनेक इलेक्ट्रिक वाहने सध्याच्या परिस्थितीत लॉन्च करण्यात येत असून यामध्ये विविध कंपन्यांच्या कार तसेच स्कूटरचा समावेश आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून  पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे कल वाढतांना दिसून येत आहे.

यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर देखील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय होत असून अनेक प्रसिद्ध अशा स्कूटर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्ये असलेले इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आलेले आहेत.

या अनुषंगाने जर आपण बजाज ऑटो या प्रसिद्ध दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201 स्पेशल एडिशन लॉन्च केली असून ग्राहकांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन वरून देखील खरेदी करता येणार आहे. कंपनीने या स्पेशल एडिशन स्कूटरच्या लुकमध्ये बदल केला असून तो फक्त ब्रुकलीन ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे.

 कशी आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन?

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणेच हे स्टील बॉडीसह येते. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्पेशल एडिशन मध्ये साईड पॅनल्स तसेच स्कफ प्लेट्स आणि ड्युअल टोन सीटवर चेतक डीकल्स देण्यात आले आहेत

. तसेच या नवीन एडिशन मध्ये डीस्क ब्रेक, अलॉय विल्स तसेच एलईडी लाइटिंग, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, मेटल बॉडी पॅनल आणि बॅटरी आयपी 67 वॉटरप्रूफिंग आहे. उत्तम ब्रेकिंग करिता दोन्ही बाजूला ड्रम ब्रेक बसवण्यात आले आहेत.

 हे आहेत इतर महत्त्वाचे वैशिष्ट्ये

यासोबतच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेवीगेशन, नियंत्रण तसेच कॉल अलर्ट आणि कस्टमाईझ करण्यायोग्य थीम,  ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सह रंगीत टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरला टेकपॅक सॉफ्टवेअर पॅकेजचा भाग म्हणून हिल होल्ड कंट्रोल आणि अतिरिक्त स्पोर्ट राईट मोड देखील देण्यात आला आहे. या बजाज चेतक 3201 स्पेशल एडिशन मध्ये 3.2kWh बॅटरी पॅक आहे

जो पूर्ण चार्ज केल्यावर 136 किलोमीटरचे रेंज देतो. रिचार्ज करण्यासाठी या बॅटरीला पाच तास तीस मिनिटांचा कालावधी लागतो. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 73 kmph आहे.

 किती आहे या स्कूटरची किंमत?

बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201(एक्स शोरूम बंगळुरू) मध्ये एक लाख तीस हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. ही किंमत प्रास्ताविक असून नंतर ती एक लाख 40 हजार रुपये होईल.

Ajay Patil