लॉन्च होणार Bajaj ची Pulsar NS400 , स्पेसिफिकेशन्स व फीचर्स पाहून प्रेमात पडाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pulsar NS400  : बजाज ही आपल्या दुचाकी सेक्टरमध्ये आपले नाव आजतागायत टिकवून आहे. नेहमीच विविध प्रयोग करत, वाहनांची गुणवत्ता देत ही कंपनी नेहमीच अग्रणी राहिली आहे. बजाजच्या तशा सर्वच गाड्या लोकप्रिय राहिल्या परंतु बजाज पल्सर ही जास्तच लोकप्रिय राहिली आहे.

आता पल्सर प्रेमींसाठी खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपली नवी बाइक Pulsar NS400 लाँच करणार आहे. या बाइकमध्ये 373.2 cc इंजिन असण्याची शक्यता आहे. बाइकमध्ये लिक्विड कूल इंजिन असून हे सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे लॉन्ग रूट ला भारी ठरेल.

दरम्यान ही बाईक डिसेंबरच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी जानेवारीत लाँच होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

* फीचर्स

या बाइकमध्ये शानदार फीचर्स असतील. दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक असतील यामुळे बाईक त्वरित कंट्रोल होईल. या बाइकला फ्युचरिस्टिक लूक देण्यात आला असून या बाईकचे इंजिन साधारण 40 bhp पॉवर आणि 35 Nm टॉर्क जनरेट करू शकेल.

सीट डिझाइन आणि हँडलबार हे लॉन्ग रूट च्या प्रवासाच्या हिशोबाने बनवले आहे. समोर असणारा डिजिटल डिस्प्ले आणि स्पीडोमीटर बाईकला अधिक शानदार लूक देईल. याची किंमत साधारण 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे.

इतर स्पेसिफिकेशन्स

इतर फीचर्स जर पहिले तर या बाइकमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम असेल. बाईकमध्ये एलईडी लॅम्प असून ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स असतील. या बाईकला टर्न इंडिकेटरसह स्टायलिश एक्झॉस्ट मिळेल.

तसेच या बाइकमध्ये 10 लिटरपेक्षा मोठी फ्यूल टँक असेल. रॉयल एनफिल्ड हिमालयन, केटीएम 250 ड्यूक आणि सुझुकी जिक्सर 250 या बाइकला ही बाईक जोरदार टक्कर देईल.

* बजाज डोमिनार 400

सध्या मार्केटमध्ये बजाज डोमिनार 400 ही शानदार बाईक देखील आहे. या बाईकमध्ये 13 लीटरची पेट्रोल टाकी आहे. या बाइकमध्ये 373.3 cc इंजिन असून ही बाईक 30 kmpl पर्यंत मायलेज देते. विशेष म्हणजे या बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

या बाईकची किंमत 2.24 लाख रुपयांपासून सुरू होते. सध्या ही बाईक देखील बाजारात चांगलीच धुमाकूळ घालत आहे. आता येणारी बाईक देखील तरुणांना जास्त आकर्षित करेल अशी आशा कंपनीला आहे.