ऑटोमोबाईल

भारतात बजाजच्या ‘या’ दोन नवीन मोटरसायकल लॉन्च, किंमतही आहे ग्राहकांच्या आवाक्यात, वाचा डिटेल्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Bajaj New Bikes : नवीन टू व्हीलर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बजाज कंपनीच्या पल्सरच्या चाहत्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की कंपनीने बजाज पल्सरचे दोन नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. यामुळे जर तुम्हाला बजाज पल्सर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आता बाजारात अधिक विकल्प उपलब्ध होणार आहेत.

कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनीने भारतीय बाजारात N160 आणि N150 या दोन पल्सर बाइक लाँच केल्या आहेत. खरे तर भारतीय बाजारात अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वत्र पल्सरची विशेष क्रेज पाहायला मिळते. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषता तरुणांमध्ये या बाईकची विशेष क्रेज आहे.

हेच कारण आहे की कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात NS160 आणि NS200 या दोन बाईक लॉन्च केल्या होत्या. आता कंपनीने पुन्हा एकदा पल्सरचे दोन नवीन मॉडेल बाजारात उतरवले आहेत. यामुळे पल्सर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आता बाजारात अनेक ऑप्शन मिळणार आहेत.

काय आहेत नव्याने लॉन्च झालेल्या बाईकच्या किमती

फेब्रुवारी महिना सुरू होण्याआधीच बजाज कंपनीने पल्सरचे दोन नवीन मॉडेल लॉन्च केले आहेत. N150 आणि N160 हे पल्सरचे दोन नवीन मॉडेल बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. यातील N160 ही बाईक ऑप्शन ब्लॅक, रेड आणि ब्लू या कलर मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत एक लाख तीस हजार 560 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

पल्सर N150 या बाईक बाबत बोलायचं झालं तर ही बाईक ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची किंमत एक लाख 17 हजार 677 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही बाईकची एक्स शोरूम किंमत आहे. या नव्याने लॉन्च झालेल्या गाडीचे डिझाईन N250 सारखेच आहे.

Ahmednagarlive24 Office