ऑटोमोबाईल

सेकंड हॅन्ड वाहन खरेदी करताना ही काळजी घ्या, नाहीतर होणार मोठी फसवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Second Hand Car Purchase : अलीकडे सर्वसामान्य लोक नवीन वाहन खरेदी करणे ऐवजी जुनी गाडी खरेदी करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. नवे वाहन विशेषता कार खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसा उपलब्ध नसल्याने अनेक बजेट अभावी सेकंड हॅन्ड कार खरेदी करतात.

भारतात सेकंड हॅन्ड कार चा मोठा बाजार आहे. अनेकजण सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री करत असतात. खरे तर अलीकडे गाड्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या चालू वर्षातही अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना नवीन गाडी खरेदी करणे थोडेसे अवघड होत आहेत. परिणामी बहुतांशी लोक नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनी कार खरेदी करणे पसंत करत आहेत. मात्र जुनी कार खरेदी करताना विशेष काळजी देखील घ्यावी लागते.

दरम्यान आता आपण जुनी कार खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जुनी कार खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या

जुनी कार खरेदीसाठी आकारला जाणार कर : जेव्हा कोणी नवीन कार खरेदी करतो, तेव्हा कारच्या किमतीत अनेक अतिरिक्त शुल्क जोडले जातात. पण जेव्हा कोणी जुनी गाडी घेतो तेव्हा त्याची या सगळ्यातून सुटका होते.

जुनी कार घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. यामुळे जर कोणी जुनी कार खरेदीसाठी कर आकारात असेल तर अशा लोकांपासून सावध राहा.

कागदपत्रे चेक करा : तुम्ही कोणतीही जुनी कार खरेदी करत असाल तर कार मालकाकडे कारची संपूर्ण कागदपत्रे असल्याची खात्री करा. अनेक वेळा थोडे फार पैसे वाचवण्यासाठी काही लोक कागदपत्रांशिवाय कार खरेदी करतात आणि नंतर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सर्व कागपत्र चेक करा. नाहीतर तुम्हाला अडचण येऊ शकते.

कार इंजिन चाचणी : वाहनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंजिन. जर तुम्ही जुनी कार खरेदी करत असाल तर तुम्हाला कारच्या इंजिनचीही संपूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे. याशिवाय, तुम्ही कारमध्ये उपस्थित असलेले सर्व फिल्टर देखील तपासले पाहिजेत. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

Ahmednagarlive24 Office