ऑटोमोबाईल

65 पेक्षा जास्त मायलेज देतात ‘या’ तीन बाईक्स, जाणून घ्या फिचर्स व स्पेसिफिकेशन्स | Best Mileage Bikes in India 2023

Published by
Tejas B Shelar

Best Mileage Bikes in India 2023 : सध्या मार्केटमध्ये अनेक दुचाकी बाईक्स आल्या आहेत. काही मायलेजला जास्त आहेत तर काही केवळ स्पोर्टी आहे.

अनेकांना सध्या मायलेज जास्त असणाऱ्या बाईक हव्या असतात. यामध्ये 100 आणि 125 सीसीपर्यंतइंजिन असलेल्या बाईक खूप लोकप्रिय आहेत.

परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असणाऱ्या या बाईक्स, जास्त मायलेज देतात. या बाइक्सचा लूक खूपच स्टायलिश आहे.

येथे आपण अशाच काही मोटारसायकलविषयी माहिती पाहणार आहोत, कि ज्या परवडेबल किमतीत येतात व त्यांचे मायलेज देखील जास्त आहे.

Bajaj CT 110X

ही बाईक ऑनरोड 8.6 PS पॉवर देते. बाईकची प्रारंभिक किंमत 69216 हजार रुपये आहे. या बाईकमध्ये 115.45 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक सध्या एकच व्हेरिएंटमध्ये येते.

या बाईकमध्ये 11 लिटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी बाईकच्या फ्रंट आणि रिअर टायरवर ड्रम ब्रेक आणि तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 70 किमी प्रति लीटर मायलेज देते.

TVS Sport

या बाईकमध्ये 10 लिटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. यात 109.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक 68 किमी प्रति लीटर मायलेज देते. बाईकच्या सीटची उंची 790 mm आहे. ही बाईक 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत येते.

या बाईकचे वजन 110 kg असून ती ऑपरेट करण्यास सोपी आहे. बाईकमध्ये अलॉय व्हील देखील देण्यात आले आहे. हे तीन वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये येते. याची एक्स शोरूम किंमत 59,431 रुपये आहे. याचे टॉप व्हेरियंट 69090 हजार रुपयांमध्ये येते.

Hero HF Deluxe

बाईकची पॉवर 7.91 बीएचपी आहे. ही बाईक 6 कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे. हे चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येते. बाईकची सुरुवातीची किंमत 62862 हजार रुपये आहे. या डॅशिंग बाईकमध्ये न्यू जनरेशन 97.2cc BS6 इंजिन देण्यात आले आहे.

ही बाईक 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकच्या फ्रंट आणि रिअर दोन्ही टायरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. Hero HF Deluxe मध्ये 9.6 लीटर ची फ्यूल टँक आहे. बाईकवर 11 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. यात टेलिस्कोपिक फ्रंट आणि रियर मॅन्युअल ड्युअल स्प्रिंग सस्पेंशन आहे. कंपनीचा दावा आहे की, 65 किमी प्रति लीटर मायलेज देईल.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com