Best Mileage SUVs Cars : या आहेत देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सर्वोत्तम 5 SUV कार, देतात 28 kmpl मायलेज, पहा किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Mileage SUVs Cars : तुम्हीही सर्वाधिक मायलेज देणारी SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देशात ५ शक्तिशाली SUV कार भारतीय ऑटो क्षेत्रात उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील आहेत. तसेच या कार मायलेज देण्याच्या बाबतीत देखील दमदार आहेत.

सध्या ऑटो क्षेत्रामध्ये SUV कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच SUV कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवीन SUV कार लाँच केल्या जात आहेत. प्रत्येक कंपनीकडून त्यांच्या अनेक नवीन SUV कार सादर करून या सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चला तर जाणून घेऊया सर्वाधिक मायलेज देणाऱ्या ५ SUV कार

Hyundai Creta

ह्युंदाई कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय SUV कार म्हणून क्रेटा ला ओळखले जाते. या कारमध्ये 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड चार-सिलेंडर इंजिन देण्यात येते. ही कार 6 स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कार 16.85km मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपये आहे.

Kia Seltos

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia कडून त्यांच्या अनेक कार भारतामध्ये सादर केल्या आहेत. त्यांची Kia seltos कार सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 17.8kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.89 लाख रुपयांपासून सुरु होते.

Skoda Kushaq

तुम्हीही स्वस्त आणि दमदार SUV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Skoda Kushaq ही कार सर्वोत्तम आहे. या कारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. ही कार 17.83kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 11.59 लाख रुपये आहे.

Volkswagen Taigun

Volkswagen Taigun ही SUV कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 18.18kmpl चा मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11.61 लाखांपासून सुरू होते.

Marut Suzuki Grand Vitara/Toyota Hyryder

मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा आणि टोयोटा कंपनीची Hyrider कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. या दोन्ही SUV कारमध्ये एकसारखेच इंजिन वापरण्यात आले आहे. या दोन्ही SUV कार 27.97kmpl मायलेज देतात. Grand Vitara आणि Hyrider ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 10.70 लाख आणि 10.86 लाख रुपये आहे.