मोठी बातमी ! मारुती सुजूकीने आपली ‘ही’ लोकप्रिय कार केली बंद, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Car : मारुती सुझुकी ही देशातील एकूण लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात लोकप्रिय झालेल्या आहेत. मारुती सुझुकीच्या अनेक गाड्यांनी तरुणांना वेड लावलेले आहे.

दरम्यान, मारुती सुझुकी या देशातील प्रमुख कार निर्माती कंपनीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या कंपनीने नुकताच आपली एक लोकप्रिय कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑफरोड एसयूव्ही जिमनीचे एक लोकप्रिय वॅरियंट बंद केले आहे.

जिमनी थंडर एडिशन हे लोकप्रिय आणि जिमनीचे सर्वात स्वस्त वॅरिएंट बंद करण्यात आले आहे. खरेतर जिमनीचा हा सर्वात स्वस्त प्रकार होता. यामुळे ज्या लोकांना स्वस्तात ऑफरोड वाहन अपेक्षित होते अशा लोकांसाठी या कारचा पर्याय खूपच फायदेशीर ठरत होता.

परिणामी बाजारात या लोकप्रिय कारला मोठी मागणी मिळू लागली होती. मात्र, आता हे स्वस्त आणि लोकप्रिय वॅरियंट बंद झाले असल्याने याचा ग्राहकांना फटका बसणार आहे. खरे तर ज्यावेळी कंपनीने हे वेरिएंट लॉन्च केले होते त्यावेळीच कंपनीकडून हा प्रकार खूपच मर्यादित काळासाठी बाजारात उपलब्ध राहील असे स्पष्ट करण्यात आले होते.

यानुसार आता कंपनीने या लोकप्रिय वेरिएंटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने हा प्रकार 1 डिसेंबर 2023 रोजी लाँच केला होता. म्हणजेच लॉन्च होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटताच कंपनीने हा प्रकार बंद केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 10.74 लाख रुपये होती.

तर जिमनीच्या रेग्युलर व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 12.74 लाख रुपये एवढी आहे. म्हणजे रेग्युलर व्हेरिएंटशी तुलना केली असता हे जिमनी थंडर एडिशन ग्राहकांना स्वस्तात मिळत होते. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचा डिफरन्स होता.

विशेष बाब अशी की कंपनी या महिन्यात जिमनीवर 1.55 लाख रुपयांची सूटही देत ​​आहे. परिणामी हे एडिशन मॉडेल ग्राहकांना खूपच स्वस्तात मिळणार होते. मात्र आता हे एडिशन मॉडेल बंद झाले असल्याने स्वस्तात ऑफ रोड वाहन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न भंगणार आहे.