ऑटोमोबाईल

मोठी बातमी, टाटा कंपनीच्या ‘या’ लोकप्रिय कारची किंमत वाढली, कंपनीने अचानक घेतला निर्णय

Published by
Ahmednagarlive24 Office

Tata Motors : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी टाटा मोटर्सची कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. ती म्हणजे टाटा मोटर्स या देशातील एका बड्या कार निर्माती कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारची किंमत वाढवली आहे.

खरे तर काही कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय गाडींवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीचा देखील समावेश आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. मात्र, टाटा मोटर्सने आपल्या एका लोकप्रिय मॉडेलची किंमत वाढवली आहे.

यामुळे टाटा कंपनीच्या कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीने आपल्या लोकप्रिय Tiago NRG या कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जर तुम्हालाही ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आता अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे.

या लोकप्रिय गाडीची किंमत 2.1 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात ही गाडी खरेदी करायची असेल तर आता अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. दरम्यान, आता आपण या गाडीची किंमत किती वाढली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती किंमत वाढली ?

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा टियागो NRG 1.2 लिटर नॉर्मल पेट्रोल मॉडेलची किंमत वाढवण्यात आली आहे. या मॉडेलच्या XZ मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 15000 रुपये आणि XT ऑटोमॅटिक वेरिएंटची किंमत पंधरा हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, टाटा टियागो NRG 1.2 लिटर CNG वेरिएंटची किंमतही वाढली आहे.

CNG मॉडेलच्या XZ मॉडेलची किंमत 15 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. अर्थातच या गाडीची वेगवेगळ्या गाड्यांची किंमत 1.85% पासून ते 2.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office