ऑटोमोबाईल

Bike Finance Plan: काय सांगता ! अवघ्या 25 हजारात घरी आणता येणार 83 kmpl मायलेजसह येणारी Hero HF100

Published by
Ahmednagarlive24 Office

Bike Finance Plan:  तुम्ही देखील तुमच्यासाठी येणाऱ्या काही दिवसात कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाइक खरेदीचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात मायलेजमुळे सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी एक असणारी बाइक Hero HF100 आता तुम्ही अवघ्या 25 हजारात घरी आणू शकतात.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Hero HF100 83 kmpl मायलेजसह बाजारात उपलब्ध आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी नवीन Hero HF100 कशी घरी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात Hero HF 100 बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत  56,968 रुपयांपासून सुरु होते आणि ऑन-रोडसाठी तुम्हाला 68,584 रुपये खर्च करावा लागतो मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता केवळ 25 हजरांच्या डाउन पेमेंटसह ही बाइक घरी आणू शकतात आणि उरलेली रक्कम दरमहा EMI सह देऊ शकतात.

Hero HF100 वित्त योजना

जर तुम्ही ही बाइक विकत घेण्यासाठी 25,000 रुपयांचे बजेट केले, तर ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला या बाइकसाठी वार्षिक 9.7 टक्के व्याजदरासह बँकेकडून 43,584 रुपयांचे कर्ज मिळेल. कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या बाइकसाठी 25,000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 14,00 रुपये मासिक EMI जमा करावे लागेल. जर हा मासिक EMI महिन्याच्या 30 दिवसांमध्ये विभागला गेला तर या बाइकचा दैनिक EMI रु. 46.6 होतो.

Hero HF 100 इंजिन

Hero HF 100 मध्ये, कंपनीने 97.2 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

Hero HF 100 मायलेज

मायलेजबद्दल, Hero MotoCorp दावा करते की HF 100 एक लिटर पेट्रोलवर 83 kmpl मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

हे पण वाचा :- Business Idea: बिनधास्त सुरु करा ‘हा’ सर्वत्र चालणारा बिझनेस ! होणार लाखोंची कमाई ; जाणून घ्या सर्वकाही

Ahmednagarlive24 Office