Skoda Kiyaq:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक सेगमेंटमधील कार्स सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार अनेक कारचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्पर्धा दिसून येते.
यामध्ये भारतातील टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या कंपन्यांच्या कार या ग्राहकांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय आहेत. परंतु या कंपन्यांच्या व्यतिरिक्त आपण जर स्कोडासारख्या कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीच्या माध्यमातून देखील अनेक सेगमेंटमध्ये कार विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या सगळ्या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये आता स्कोडा देखील उतरल्याचे आपल्याला दिसून येत आहे.विशेष म्हणजे भारतीय कार बाजार पेठेमध्ये स्कोडाच्या गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळत असून या पार्श्वभूमीवर स्कोडाने काल म्हणजेच दोन डिसेंबर पासून त्यांच्या नव्या आणि सर्वात स्वस्त असलेल्या एसयूव्हीचे बुकिंग सुरू केली आहे
व ती बुकिंग तुम्हाला फक्त अकरा हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. जर तुम्हाला स्कोडाची ही कार घ्यायची असेल तर तिचे नाव आहे स्कोडा कीयाक हे होय. याच कार विषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कसे आहेत स्कोडा कीयाक मधील फीचर्स?
या कारमध्ये दहा इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच ऑटोमॅटिक हेडलॅम्पस, एलईडी हेडलॅम्पस, पावर सीट्स, व्हेंटिलेटर फ्रंट सीट्स व त्यासोबत सनरूफ देखील दिले आहे.
तसेच या कारमध्ये वायरलेस फोन चार्जर, किलेस एन्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॉश बटन स्टार्ट/ स्टॉप, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा व सहा एअर बॅग यासारखे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वाची फीचर्स देण्यात आली आहेत.
कसे आहे या कारचे इंजिन?
स्कोडा कीयाकमध्ये कंपनीने 1.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले असून हे इंजिन 114 बीएचपी पावर आणि 178 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच या कारमध्ये टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन्ही प्रकारचे गिअरबॉक्स देण्यात आले आहे.
परंतु जर इतर वैशिष्ट्यांबद्दल बघितले तर कंपनीने या कार मध्ये मात्र 360 डिग्री कॅमेरा आणि एडीएएस सारखे फीचर्स मात्र दिलेले नाहीत. कंपनीने ही कार सिग्नेचर, सिग्नेचर प्लस, प्रेस्टीज आणि क्लासिक अशा चार व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे व त्यासोबतच काळा, पोपटी तसेच लाल, निळ्या व पांढऱ्या अशा रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.
किती आहे या कारची किंमत आणि कधी मिळेल डिलिव्हरी?
स्कोडा कियाक या कारच्या बेस मॉडेलची किंमत सात लाख 89 हजार रुपये इतकी असणार आहे व टॉप मॉडेलची किंमत 14 लाख 50 हजार रुपये पर्यंत आहे. ( या किमती एक्स शोरूम आहेत.) सध्या या कारची बुकिंग सुरू झाली असून डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे व या कारचे अनावरण 17 जानेवारी 2025 रोजी भारत मोबिलिटी शोमध्ये केले जाणार आहे.