ऑटोमोबाईल

TVS iQube EV Scooter : अवघ्या 20 हजारांत घरी आणा TVS ची स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर, पहा कसे ते…

Published by
Ahmednagarlive24 Office

TVS iQube EV Scooter : देशात पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच अनेकांना दररोजच्या प्रवासासाठी पेट्रोल बाईक आणि स्कूटर वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अनेक बाईक निर्मात्या कंपन्या त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करत आहेत.

देशातील दुचाकी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र किमती जास्त असल्याने अनेकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येत नाहीत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही 20 हजार रुपयांमध्ये TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता. 20 हजार रुपये डाऊन पेमेंट भरून तुम्ही देखील TVS iQube EV स्कूटर घरी आणू शकता.

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर Standard आणि S या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. TVS iQube Standard व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1,55,553 लाख रुपये आहे. तर S व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1,62,090 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 118 किलो आहे. तुम्ही देखील ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज करून 100 किमी पर्यंत प्रवास करू शकता.

TVS ची iQube इलेक्ट्रिक स्कूटर तीन रंग पर्यायामध्ये विकली जात आहे. पर्ल व्हाइट, रेडियंट रेड आणि ग्लॉसी टायटॅनियम ग्रे असे रंग पर्याय स्कूटरमध्ये उपलब्ध आहेत. या EV स्कूटरचा टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे.

तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला TVS iQube स्कूटरचे Standard व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर तुम्ही अवघ्या 20 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटवर ती घरी आणू शकता. iQube Standard EV स्कूटरची ऑन रोड किंमत 1,61,907 रुपये आहे.

वीस हजार डाऊनपेमेंट भरल्यास तुम्हाला 1.42 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाईल. 3 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाईल. 36 महिन्यांसाठी दरमहा तुम्हाला 4,516 रुपयांचा EMI भरवा लागेल.

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे S व्हेरियंट तुम्ही अवघ्या 20 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटवर घरी आणू शकता. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून 1.58 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. स्कूटरवर 9 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी कर्ज उपलब्ध आहे. दरमहा तुम्हाला 5,024 रुपये EMI भरावा लागेल.

Ahmednagarlive24 Office