Mahindra Car Discount Offers : महिंद्रा मोटर्स ग्राहकांना मे महिन्यात निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर लाखोंच्या सवलतीचा लाभ देत आहे. यावेळी, जर तुम्हाला खूप कमी किमतीत एक शक्तिशाली SUV कार घ्यायची असेल, तर महिंद्राकडून देण्यात येत असलेला डिस्काउंट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कंपनी आपल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV कार्सवर लाखोंच्या सवलती देऊन ग्राहकांना कार खरेदीसाठी आकर्षित करत आहे.
महिंद्र मे महिन्यात XUV700 वर एकूण 1.5 लाख पर्यंत सूट देत आहे त्याची सुरुवातीची किंमत 13.99 लाख आहे. कंपनी तिच्या AX5 7-सीटर डिझेल मॅन्युअल आणि AX5 7-सीटर पेट्रोल मॅन्युअलसह ऑटोमॅटिकवर 1.3 लाख रुपयांच्या रोख सवलतीचा लाभ देत आहे.
कंपनीच्या अतिशय लोकप्रिय SUV कार Mahindra XUV300 वर एकूण 1.5 लाख रुपयांपेक्षा सूट देण्यात येत आहे. तर कंपनी तिच्या W8 ट्रिमच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या खरेदीवर 1.59 लाखांपर्यंत एकूण सूट देत आहे, ग्राहकांना त्याच्या W2 ट्रिमवर एकूण 45,000 चा फायदा मिळेल. त्याच वेळी, या एसयूव्हीच्या W8 डिझेल व्हेरिएंटवर 1.79 लाख रुपयांपर्यंतचा फायदा दिला जात आहे. या SUV कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे.
सवलत ऑफर अंतर्गत महिंद्राच्या लोकप्रिय SUV Scorpio-N च्या 2023 च्या मॉडेलवर उपलब्ध असलेल्या सवलतीबद्दल सांगायचे तर, कंपनी ग्राहकांना स्कॉर्पिओच्या Z8 आणि Z8L च्या खरेदीवर एकूण 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. स्कॉर्पियो-N व्हेरिएंटवर कपंनी एकूण 60,000 रुपयांपर्यंत बचतीची संधी देत आहे. Scorpio-N SUV कारची सुरुवातीची किंमत 13.60 लाख रुपये आहे.
महिंद्रा बोलेरोच्या 2023 मॉडेलवर डिस्काउंट ऑफर अंतर्गत उपलब्ध असलेल्या सवलतींबद्दल बोलायचे झाल्यास, बोलेरो निओवर 83,000 रुपये वाचवण्याची संधी आहे. या SUV कारची एक्स-शोरूम किंमत 9.9 लाख रुपये आहे. त्याच वेळी, कंपनी महिंद्रा बोलेरोच्या 2023 मॉडेलवर 82,000 रुपयांपर्यंतच्या एकूण सूट ऑफरचा लाभ देत आहे. महिंद्रा बोलेरोच्या 2023 मॉडेलची सुरुवातीची किंमत 9.89 लाख रुपये आहे.
कंपनी डिस्काउंट ऑफर लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या Mahindra XUV400 SUV कारवर एकूण 4.4 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ईव्हीची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. कंपनीने 2024 मध्ये लॉन्च केलेल्या महिंद्राच्या या नवीन प्रकारावर 1.4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे.