ऑटोमोबाईल

Maruti Swift : ‘येथून’ खरेदी करा स्विफ्ट, एक रुपयाही GST लागणार नाही, 5 लाखांत मिळेल कार

Published by
Ahmednagarlive24 Office

मारुती सुझुकी ही फोरव्हीलर सेगमेंटमध्ये सध्या आघाडीची कंपनी बनली आहे. मागील काही दिवसांत या कंपनीच्या कार युनिटच्या विक्रीत प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मारुतीच्या विविध कार बाजारात आहेत. यातील एक लोकप्रिय म्हणजे स्विफ्ट ! मारुती स्विफ्टची मोठी क्रेझ दिसून येते.

मारुतीच्या या कार ची विक्रीदेखील खूप जास्त आहे. आता कंपनीने एक जबरदस्त सुविधा सुरु केली आहे. याअंतर्गत जर तुम्ही मारुती स्विफ्ट खरेदी केली तर तुम्हाला एक रुपया देखील GST लागणार नाही. त्यामुळे खूप स्वस्तात तुम्हाला ही कार खरेदी करता येईल. चला याबद्दल विस्ताराने जाणून घेऊयात

कंपनीने आता आपल्या देशाचे जवान अर्थात जे लोक सुरक्षा दलात असून देशसेवा करत आहेत त्यांच्यासाठी स्विफ्ट कार कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट म्हणजेच CSD मध्ये देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येथून अतिशय स्वस्त दरात स्विफ्ट खरेदी करता येणार आहे. चला याच्या किमती किती कमी होतात ते एकदा पाहुयात..

मारुती स्विफ्ट LXI : CSD मध्ये तब्बल 86,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत बचत होते. इतक्या किमती कमी होऊन किमतीत उपलब्ध आहे. स्विफ्ट LXI मॅन्युअल बेस व्हेरिएंट CSD मध्ये 5,13,367 रुपयांत उपलब्ध आहे. शोरूममध्ये सामान्य ग्राहकांनी ही कार घेतली तर त्याची किंमत 5,99,450 रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच जर स्विफ्ट मॅन्युअल LXI ही कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट म्हणजेच CSD वरून खरेदी केली तर 86,083 रुपयांची बचत होईल.

Swift VXI ऑटोमॅटिक : Swift VXI ऑटोमॅटिक व्हर्जन जे आपण पाहिले तर ते 6,47,092 रुपयांत उपलभ आहे. आणि तेच मॉडेल सामान्य लोकांसाठी शोरूममध्ये 7,50,000 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच जर हे मॉडेल CSD वरून खरेदी केले तर 97 हजार 177 रुपयांची बचत होते.

Swift VXI CNG : Swift VXI CNG मॉडेल देखील तुम्हाला येथे कमी किमतीत उपलब्ध होईल. हे मॉडेल CSD मध्ये तुम्हाला 6,80,755 रुपयांत मिळेल. हेच मॉडेल जर तुम्ही शोरूममध्ये खरेदी केले तर सामान्य ग्राहक म्हणून तुम्हाला ते 7,85,000 रुपयांना मिळेल. म्हणजेच यावर साधारण 1,04,245 रुपयांची सूट मिळणार आहे.

Swift ZXI CNG : Swift CNG ZXI च्या किमतीबद्दल जर आपण पाहिलेत तर 8,53,000 रुपये याची शोरूम मध्ये किंमत आहे. पण जर हीच कार CSD वरून खरेदी केली तर मात्र 7,35,042 रुपयांना मिळेल. म्हणजेच जवळपास 1,17,958 रुपयांची याठिकाणी बचत होताना दिसते.

Maruti Swift विषयी थोडी माहिती

Maruti Swift ही LXi, VXi, ZXi व ZXi+ या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. CNG ऑप्शन केवळ VXi आणि ZXi ट्रिममध्येच येतो. मारुती स्विफ्टमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून ते 90PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. Maruti Swift मध्ये 268 लीटरची बूट स्पेस मिळते. या चारच्या मायलेजबाबत पाहिले तर पेट्रोल व्हेरिएंट 22 kmpl आणि CNG व्हेरिएंट 30.90km/kg इतकी मायलेज देते.

Ahmednagarlive24 Office