गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पांच्या आगमन झाले व या कालावधीपासून आपल्या भारतामध्ये सणांची देखील सुरुवात होते. गणेश चतुर्थी पासून पाहिले तर नवरात्री आणि दिवाळी सारखे मोठे सण या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत येत असतात. या सणासुदीच्या कालावधीमध्ये महत्त्वाचे असे शुभ मुहूर्त येतात व या शुभ मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी केली जाते.
त्यामुळे विक्री वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कार उत्पादक कंपन्या देखील अनेक प्रकारचे प्रयत्न करतात व या कालावधीत अनेक गाड्यांवर अनेक सवलत ऑफर जारी केल्या जातात. अगदी याच पद्धतीने या सणासुदीच्या कालावधीमध्ये टाटा मोटर्सने देखील फेस्टिवल ऑफ कार्स लॉन्च केले असून या माध्यमातून ग्राहकांना कार आणि एसयूव्ही खरेदीवर साधारणपणे दोन लाख पाच हजार रुपये पर्यंतचे एकत्रित फायदे मिळण्याची शक्यता आहे.
तुम्हाला देखील या कालावधीत कार घ्यायची असेल तर तुम्ही या टाटा मोटर्सच्या फेस्टिवल कार ऑफरचा 31 ऑक्टोबर पर्यंत लाभ घेऊ शकतात.
टाटा मोटर्सच्या या कार्सवर मिळत आहे बंपर सवलत
याबाबत सविस्तर वृत्त असे की,टाटा मोटर्सच्या माध्यमातून फेस्टिवल ऑफ कार्स लॉन्च करण्यात आलेले आहे व यामध्ये कार व एसयूव्ही खरेदीवर दोन लाखापेक्षा जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे. टाटा कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या ऑफरचा फायदा 31 ऑक्टोबर पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे. यामध्ये जर तुम्हाला टाटाची टियागो ही कार घ्यायची असेल तर तुम्ही अतिशय कमी किमतीमध्ये ती घेऊ शकतात.
टाटा टियागो ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत आता पाच लाख रुपयांपेक्षा कमी असून या फेस्टिवल ऑफ कार्स ऑफर अंतर्गत तुम्ही टाटाची ही टियागो कार 65 हजार रुपये कमी किमतीत घेऊ शकतात. तसेच टाटाची अतिशय प्रसिद्ध असलेली सब चार मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सन कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटची किंमत देखील 80 हजार रुपये कमी करण्यात आलेली आहे. आता या कारची नवीन एक्स शोरूम किंमत सात लाख 99,990 रुपयांपासून सुरू झाली आहे.
सेच टाटा मोटरची प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ कारच्या किमतीत 45 हजार रुपये पर्यंत कपात करण्यात आली असून या कारची नवीन एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजार 900 रुपयांपासून सुरू झाली आहे. इतकेच नाहीतर टाटाची सगळ्यात पावरफुल असलेली एसयूव्ही म्हणजे सफारी असून या कारची किंमत एक लाख 80 हजार रुपयांनी कमी झाली असून तिची नवीन एक्स शोरूम किंमत आता 15 लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होते
व या वाहनावर या फेस्टिवल ऑफर अंतर्गत 45 हजार रुपये पर्यंतचे अतिरिक्त फायदे देखील मिळत आहेत. इतकेच नाही तर टाटाची मिडसाईज एसयूव्ही म्हणून ओळखली जाणारी हॅरियर या कारची किंमत आता एक लाख साठ हजार रुपयांनी कमी करण्यात आली असून तिची नवीन एक्स शोरूम किंमत 14 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.
टाटाच्या एन्ट्री लेवल सेडान टीगोर कारच्या किमतीत देखील 30000 पर्यंत कपात करण्यात आली असून तिचे आता नवीन एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार 900 रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे कंपनीने या ऑफर अंतर्गत टिगोर कारच्या पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटच्या किमतीत कपात केलेली आहे.