Maruti Suzuki Cheapest Car : मारुती सुझुकीची ही डॅशिंग कार खरेदी करा फक्त ७ लाख रुपयांमध्ये, मिळतात शक्तीशाली वैशिष्ट्ये आणि ३० किमी मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Cheapest Car : तुम्हीही मारुती सुझुकी कंपनीची स्वस्त आणि धमाकेदार वैशिष्ट्ये असलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक कार उपलब्ध आहे. या कारची किंमत ७ लाख रुपये असून यामध्ये अनके प्रीमियम फीचर्स दिले जातात.

मारुती सुझुकी कंपनी देशामध्ये कार विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. या कंपनीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत.

तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियम फीचर्स असलेली मारुतीची कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बलेनो ही कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कंपनीकडून ही कार गेल्या काही महिन्यापूर्वीच सीएनजीमध्ये सादर करण्यात आली आहे.

मारुती सुझुकी बलेनो CNG

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांची कमी बजेट कार बलेनो पहिल्यांदा पेट्रोल इंजिनमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आता कंपनीकडून ही कार सीएनजी पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कारमध्ये कंपनीकडून 1197 cc चे इंजिन देण्यात आले आहे. बलेनो कार सीएनजी मॉडेलमध्ये 30.61km/kg मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम देण्यात आले आहे. तसेच 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे.

मारुती सुझुकी बलेनो किंमत

मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनो कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच या कारचे सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.28 लाख रुपये आहे. कारमध्ये 55-लीटरची इंधन टाकी देण्यात येते.

मारुती सुझुकी बलेनो कार इंजिन

मारुती सुझुकी कंपनीकडून कारमध्ये 1197 cc चे पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 88.5 Bhp चा पॉवर निर्माण करते. तसेच पेट्रोल व्हर्जनमध्ये ही कार 22 kmpl पर्यंत मायलेज देते. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

बलेनो कार सहा मोनोटोन रंगांमध्ये आणि चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप असे फीचर्स कारमध्ये देण्यात येत आहे. तसेच मारुतीच्या या कारला भारतामध्ये प्रचंड मागणी आहे.