ऑटोमोबाईल

नवीन वर्षात कार घेणे होणार महाग ! ‘ही’ कंपनी वाढवणार Cars च्या किंमती, किती वाढणार दर ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Care Price In India : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या 18 दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र येणारे नवीन वर्ष हे कार घेणाऱ्या लोकांसाठी थोडेसे चिंताजनक राहणार आहे.

कारण की नवीन वर्षात जवळपास सर्वच कंपन्या कारच्या किंमती वाढवणार आहेत. यामुळे जर तुम्हालाही कार घ्यायची असेल तर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला नवीन कार खरेदी करावी लागणार आहे. नाहीतर तुम्हाला पुढील वर्षी कार घेण्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागू शकते.

यामुळे तुमच्या खिशावर निश्चितच ताण पडणार आहे. मारुती सुझुकी, टाटा, हुंदाई, महिंद्रा, सिट्रोएन, ऑडी या कंपन्यांनी आतापर्यंत नवीन वर्षात किमती वाढवणार असे आधीच जाहीर केले आहे. यामुळे जर तुम्हालाही या कंपन्यांपैकी एखादी कंपनीची कार खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंतच या कंपन्यांच्या गाडीची खरेदी करावी लागणार आहे. नाहीतर पुढील वर्षी या गाड्यांसाठी तुम्हाला अधिकचा पैसा द्यावा लागणार आहे.

अशातच आता लक्झरी गाड्या बनवणाऱ्या बीएमडब्ल्यू या कंपनीने देखील गाड्यांच्या किंमती वाढवण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 पासून BMW च्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. आता आपण BMW नवीन वर्षात गाड्यांच्या किमती किती वाढ होणार याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

BMW चे किती मॉडेल

BMW ही जगातील एक दिग्दर्शक ऑटोमेकर कंपनी आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधील ही कंपनी भारतात देखील खूपच लोकप्रिय आहे. बीएमडब्ल्यू फक्त लक्झरीस गाड्या बनवते. सध्या स्थितीला ही कंपनी आपल्या भारतात 11 पूर्णपणे नॉक-डाउन (CKD) आणि 11 पूर्णपणे बिल्ट (CBU) युनिट्सची विक्री करत आहे.

यामध्ये 2 सीरीज ग्रॅन कूप, 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन, M 340i, 5 सीरीज, 6 सीरीज, 7 सीरीज, X1, X3, X5, X7 आणि मिनी कंट्रीमन यांचा समावेश आहे. दुसरीकडे, CBU मध्ये Z4, M4 Coupe, X3 M40i, X4 M40i, M5, M8 Coupe, XM, iX1, 14, 17 आणि iX सारखे मॉडेलचा समावेश करण्यात आला आहे.

किती वाढणार किंमती ?

बीएमडब्ल्यू कंपनी आपल्या सर्व मॉडेलच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवणार अशी माहिती समोर आली आहे. तथापि प्रत्यक्षात गाड्यांची किमती किती वाढणार याबाबत कंपनीकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office