कार खरेदी करताय ? 31 किलोमीटरचे मायलेज देणारी ‘ही’ गाडी ठरणार बेस्ट ऑप्शन, किंमतही बजेटमध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget Car : नवीन वर्षात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर अनेकांनी या नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याचा संकल्प घेतलेला असेल. आपल्या परिवारासाठी अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. मात्र कोणती कार खरेदी करावी, कोणती कार बजेटमध्ये येईल हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जर तुमचाही असाच प्रश्न असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका भन्नाट कारची माहिती घेऊन हजर झालो आहोत जी का तुमच्या बजेटमध्येही फिट राहणार आहे आणि विशेष म्हणजे तिचे मायलेज देखील दमदार राहणार आहे. खरे तर भारतीय बाजारात मध्यमवर्गीयांमध्ये अधिक मायलेज देणारी आणि मिड बजेट कार विशेष लोकप्रिय ठरते. यामुळे मारुती सुझुकी या कंपनीने मध्यमवर्गीयांसाठी अशीच एक अधिक मायलेज देणारी बजेट कार तयार केली आहे.

मारुती सुझुकी अल्टो ही कंपनीची अशी एक लोकप्रिय कार आहे जी सर्वसामान्यांची आवडती कार ठरली आहे. आतापर्यंत कंपनीने 42 लाख अल्टो कारची विक्री केली आहे. यावरून या गाडीचे लोकप्रियता भारतीय बाजारात खूपच अधिक आहे हे आपल्या लक्षात येते. दरम्यान आता आपण या गाडीच्या मायलेज विषयी आणि किमती विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारच्या विशेषता काय आहेत

या कारमध्ये पावरफुल इंजिन देण्यात आले आहे. किमतीशी तुलना केली असता या कारचे इंजिन खूपच चांगले आहे. ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये 796cc, 3 सिलेंडर F8D इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन पेट्रोलवर 35.3 kW @ 6000 rpm आणि CNG वर 30.1 kW @ 6000 rpm ची कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच, हे CNG वर 60 Nm @ 3500 rpm चा टॉर्क जनरेट करू शकते असा दावा कंपनीने केला आहे.

पेट्रोल गाडीच्या इंधन टॅंकची क्षमता 35 लिटर एवढी आहे. ही गाडी पेट्रोलवर 22 किलोमीटर पर्यंतचे आणि सीएनजी वर 31.59 किलोमीटर प्रति किलो पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीच्या पेट्रोल वॅरियंटची एक्स शोरूम किंमत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 3.54 लाख रुपये एवढी आहे. तसेच सीएनजी गाडीची किंमत राष्ट्रीय राजधानीत 5.13 लाख रुपये एवढी आहे. ही देखील एक्स शोरूम किंमत आहे. गाडीची ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहते.