ऑटोमोबाईल

CNG कार खरेदी करताय ? ‘हे’ आहेत बेस्ट 3 ऑप्शन, सनरूफ सुद्धा मिळणार

Published by
Ahmednagarlive24 Office

CNG Car With Sunroof : अलीकडे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हेच कारण आहे की, देशात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे.

याशिवाय अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीला कंटाळून सीएनजी कार खरेदीला विशेष पसंती दाखवत आहेत. मात्र अनेकांची सीएनजी कार तर खरेदी करायची आहे पण त्या कारला चांगले मायलेज असले पाहिजे आणि सनरूफ सुद्धा मिळायला पाहिजे अशी इच्छा आहे.

दरम्यान आज आपण चांगले दमदार मायलेज आणि सनरूफसह येणाऱ्या तीन कारची माहिती जाणून घेणार आहोत.

Tata Altroz CNG : टाटा ही देशातील एक प्रमुख वाहन निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तरुणाईला या कंपनीच्या अनेक गाड्या आवडतात. यामध्ये प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजचा देखील समावेश आहे.

ही गाडी मे 2023 मध्ये सीएनजी पॉवरट्रेनसह बाजारात आली होती. ही गाडी अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहे. ज्या लोकांना सीएनजी कार मध्ये सनरूफ हवे आहे अशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरू शकते. ही गाडी सिंगल-पेन सनरुफसह ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहे.

यां गाडीची किंमत 8.85 लाख रुपये एवढी आहे. मात्र ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. यामध्ये 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, एयर प्यूरीफायर आणि ऑटोमॅटिक एसीसारखे फीचर्स ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या गाडीचे मायलेज देखील खूपच चांगले आहे. यां गाडीच मायलेज 26.2 km/kg एवढे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Tata Punch CNG : टाटा कंपनीची ही आणखी एक लोकप्रिय सीएनजी कार आहे. या गाडीची लोकप्रियता डे बाय डे वाढत आहे. ग्राहकांना ही गाडी विशेष मोहित करीत आहे. टाटा पंच सीएनजी व्हेरिएंटमध्ये सनरुफ सुद्धा येते.

यामुळे जर तुम्हाला सनरुफ अन दमदार मायलेजची सीएनजी कार हवी असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. पंच सीएनजीच्या एक्म्लिश्ड डॅजल एस व्हेरिएंटमध्येच सनरुफ मिळतो. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये सनरूफचा ऑप्शन नाहीये.

दरम्यान सनरूफ असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 9.68 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही गाडी 27 km/kg चं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Hyundai Exter CNG : हुंडई ही देखील टाटा प्रमाणे देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. एक्सटर ही अलीकडेच बाजारात आलेली CNG कार आहे. या गाडीमध्ये ग्राहकांना सनरुफ देखील दिले जात आहे.

याच्या एकएक्स सीएनजी व्हेरिएंटमध्ये सिंगल-पेन सनरुफ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यां गाडीची किंमत 9.06 लाख रुपये एवढी आहे. ही कार 27.10 km/kg चं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

जर तुम्हाला सनरूफसह येणारी सीएनजी कार खरेदी करायची असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरू शकतो.

Ahmednagarlive24 Office