Upcoming Car In India : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात, मग आजची बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. कारण की, आज आपण फेब्रुवारी 2024 अखेर लाँच होणाऱ्या कारची माहिती पाहणार आहोत. जस की आपणास ठाऊक आहेच की, गेल्या महिन्यात आपल्याला टाटा मोटर्स भारतात सीएनजी ऑटोमॅटिक कार लाँच करणार ही माहिती मिळाली होती.
Tata Motors टाटा टियागो अन टाटा टिगोर या गाड्या सीएनजी व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार अशी माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता याच संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे. आता अशी बातमी हाती येत आहे की, टाटा मोटर्स या चालू महिन्यातच भारतात या सीएनजी ऑटोमॅटिक कार लाँच करणार आहे.
याशिवाय महिंद्रा आणि ह्युंदाई या कंपन्या देखील आपल्या नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आता आपण या अपकमिंग लाँच होणाऱ्या गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Tata Tigor : टाटा मोटर्स आपल्या सेडान टिगोर सीएनजी मॉडेलचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर करणार आहेत. यात 1.3 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन तसेच ड्युअल सीएनजी सिलेंडर असेल, जे 73.5 पीएस पॉवर आणि 95 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे. या इंजिनसोबत 5 स्पीड एएमटी म्हणजे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध होणार आहे. लुक-फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत ही कार खूपच उत्कृष्ट राहणार आहे.
Tata Tiago : Tata या लोकप्रिय कार निर्माता कंपनीच्या माध्यमातून Tiago CNG चे ऑटोमॅटिक व्हेरियंट लवकरच लाँच केले जाणार आहे. हे मॉडेल या चालू फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात लॉन्च होणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. यात ड्युअल सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले जाणार आहेत. यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे परेशान झालेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Mahindra XUV300 फेसलिफ्ट : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लवकरच बाजारात आपल्या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करणार आहे. XUV300 या लोकप्रिय कारचे फेसलिफ्ट मॉडेल या चालू महिन्यातच अर्थातच फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत बाजारात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, कंपनीने याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान या फेसलिफ्ट वर्जन मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.
Hyundai Creta नवीन कार : ह्युंदाई या लोकप्रिय वाहन निर्माता कंपनीच्या माध्यमातून भारतात लवकरच एक नवीन कार लॉन्च केली जाणार आहे. Hyundai Creta फेसलिफ्टचे N-Line मॉडेल आता बाजारात लॉन्च केले जाणार अशी माहिती समोर आली आहे. या Creta N-Line मध्ये, N Line बॅजिंग बाहेरील आणि आतील भागात विविध ठिकाणी दिसेल आणि त्याचे लाल उच्चारण अधिक स्पोर्टी लुक देईल, अशी आशा आहे. ही गाडी या महिन्याच्या अखेरपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कंपनीने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.