ऑटोमोबाईल

Scooter खरेदी करताय ? एका लाखापेक्षा कमी किमतीच्या ‘या’ 3 स्कूटर तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन

Published by
Ahmednagarlive24 Office

Scooter To Buy : आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या नवीन वर्षात अनेक सण उत्सव येणार आहेत. अशा परिस्थितीत सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असतील.

जर तुम्हीही या नवीन वर्षात सणासुदीमध्ये नवीन स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या प्रमुख तीन स्कूटरची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर अलीकडे महिलांप्रमाणेच नवयुवक तरुण देखील स्कूटरचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. बाजारात अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटर देखील आले आहेत. मात्र असे असेल तरी आजही पेट्रोल स्कूटरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

पेट्रोल स्कूटर आजही अनेकांना आवडते. त्यामुळे आज आपण एक लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या तीन पेट्रोल स्कूटरची माहिती जाणून घेणार आहोत.

TVS ज्युपिटर :

TVS ही भारतातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक बाईक्स आणि स्कूटर लोकप्रिय आहेत. यामध्ये टीव्हीएस ज्युपिटर चा देखील समावेश होतो. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 73,340 रुपयांपासून सुरू होते.

देशात या गाडीचे 6 प्रकार आहेत. ही गाडी तब्बल 16 रंगात ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहे. म्हणजे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार याठिकाणी कलर उपलब्ध होणार आहे. या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही 89,748 रुपये एवढी आहे. ज्युपिटरमध्ये 109.7 ccBS6-2.0 इंजिन आहे जे 7.88 PS पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Suzuki Access 125 :

Suzuki ही देशातील ऑटो सेक्टर मधील एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यात स्कूटरचा देखील समावेश होतो. कंपनीची Suzuki Access 125 ही स्कूटर ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

या स्कूटरमध्ये 124 cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.7 PS @ 6750rpm ची कमाल पॉवर देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 79,899 ते 90,000 रुपयांपर्यंत जाते.

म्हणजे या स्कूटर ची किंमत ही एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ही स्कूटर सीबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टमसह बाजारात उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देखील पाहायला मिळतात.

Yamaha RayZR 125 :

यामाहाच्या अनेक स्पोर्ट बाईक नवयुवकांच्या पसंतीस खऱ्या उतरल्या आहेत. शिवाय कंपनीच्या स्कूटर देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीची Yamaha RayZR 125 ही स्कूटर एक लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये एक लोकप्रिय वाहन आहे.

याची एक्स शोरूम किंमत 84,730 रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. देशात ही स्कूटर 5 प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही स्कूटर 12 रंगांत उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कलर उपलब्ध होतो. या गाडीच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 94,830 रुपये एवढी आहे.

Ahmednagarlive24 Office