आयुष्यातील पहिली कार खरेदी करताय?, मग “हे” पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरतील !

Ahmednagarlive24 office
Published:
Bying First Car

Bying First Car : जेव्हा आपण आपली पहिली कार घेतो तेव्हा आपण शक्यतो सर्वांचा सल्ला घेतो. पहिली गाडी घेताना आपण खूप विचार करतो. आजच्या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल माहिती देणार आहोत, ज्या तुम्ही पहिल्यांदा खरेदी करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा कार घ्यायची असते, तेव्हा त्याच्या समोर खूप पर्याय उपलब्ध असतात, म्हणूनच बऱ्याचदा गोंधळ उडतो. अस्थितीत आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता हे समजत नाही. म्हणूनच आज आम्ही अशा गाड्यांची लिस्ट घेऊन अलो आहोत ज्या लुक, फीचर्स आणि सेफ्टीसह सर्वोत्तम आहेत.

Maruti Suzuki S-Presso

मारुतीकडून, एस प्रेसो ही एसयूव्ही डिझाइनसह ऑफर केली जाते. हे 7-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, रिमोट की-लेस एंट्री, स्पीड अलर्ट सिस्टम, एअरबॅग्ज, ABS, EBD सारख्या वैशिष्ट्यांसह येते आणि त्याची किंमत 4.27 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही जर तुमच्यासाठी प्रथम कार घेण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असेल तसेच ही कार अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे.

Maruti Wagon R

मारुतीकडून दुसरा पर्याय म्हणून वॅगन आर खरेदी करता येईल. ही देशातील सर्वाधिक पसंतीची हॅचबॅक कार देखील आहे. यात तुम्हाला कीलेस एंट्री, एअरबॅग्ज, ABS, EBD, स्पीड अलर्ट सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सात-इंच इंफोटेनमेंट टचस्क्रीन सारखी उत्तम फीचर्स पाहायला मिळतील, ही कार उंच लोकांसाठी चांगला पर्याय मानली जाते. याची किंमत 5.52 लाख रुपये आहे. हा देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Renault KWID

Kwid ही रेनॉल्टने एंट्री लेव्हल हॅचबॅक म्हणून ऑफर केली आहे. याला एसयूव्ही लूकही देण्यात आला आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देखील मिळतात. यासोबतच ड्युअल एअरबॅग्ज, आठ इंची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 4.7 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही प्रथम कार खरेदी करत असाल तर याचा तुम्ही विचार करू शकता.

Tata Tiago

Tiago ही टाटाची सर्वात कमी किमतीची हॅचबॅक कार आहे. हे सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायासह देखील खरेदी केले जाऊ शकते. ऑटो डोअर लॉक, एबीएस, ईबीडी, एअरबॅग्ज, इन्फोटेनमेंट सिस्टीमसह एनसीएपी क्रॅश चाचणीमध्ये याला चार तारे मिळाले आहेत. या कारची किंमत 5.6 लाख रुपयांपासून सुरू होते. हा देखील एक उत्तम पर्याय ठरेल.

Hyundai Grand i10

Hyundai द्वारे Grand i10 ऑफर करण्यात आली आहे. या कारमध्ये फीचर्स, सेफ्टी आणि अ‍ॅव्हरेजची कोणतीही अडचण नाही. i10 Grand Nios ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD, रियर पार्किंग कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह 5.73 लाख रुपयांना खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe