ऑटोमोबाईल

Car Buying Tips: तुमचा देखील नवरात्रीत कार खरेदी करायचा विचार आहे का? फक्त करा ‘या’ गोष्टी, कारची ऑन रोड किंमत होईल कमी? वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Car Buying Tips:- दसरा असो किंवा दिवाळी तसेच अनेक शुभ मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्याचा एक ट्रेंड आहे व हा ट्रेंड फार पूर्वापार चालत आलेला आहे. आपण कुठलेही वाहन खरेदी करायला जातो तेव्हा त्या वाहनाची किंमत आणि मिळणारे वैशिष्ट्ये यांचा विचार करूनच वाहन खरेदीचा निर्णय घेत असतो.

यामध्ये जर काही जणांना कार खरेदी करायची असेल तर आपल्याला कारच्या एक्स शोरूम तसेच इतर काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात व यामुळे कारची ऑन रोड किंमत खूप जास्त प्रमाणात असते.

परंतु अशा काही गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही अवलंबल्या तर तुम्ही कारची ऑन रोड किंमत कमी करू शकतात व कमीत कमी किमतीमध्ये तुम्ही कार घेऊ शकतात.त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत की यांचा अवलंब केल्यामुळे कारची ऑन रोड किंमत कमी होऊ शकते. याबद्दलचीच माहिती आपण बघणार आहोत.

 कारच्या ऑन रोड किमतीमध्ये या गोष्टींचा केला जातो समावेश

आपण नवीन कार घ्यायला जातो तेव्हा कारची जी काही किंमत असते त्यामध्ये त्या कारची एक्स शोरूम किंमत, रजिस्ट्रेशन साठी लागणारा खर्च तसेच इन्शुरन्स प्राईस, एक्सटेंडेड वारंटी प्राईस आणि इतर आवश्यक ॲक्सेसरीज इत्यादींची किंमत कारच्या ऑन रोड किमतीमध्ये समाविष्ट केलेली असते.

यापैकी तुम्ही जेव्हा नवीन कार खरेदी करायला जाल तेव्हा काही गोष्टी कमी करून कारची ऑन रोड किंमत कमी करू शकतात.त्यासाठी कार घेताना तुम्ही काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे व त्या म्हणजे…..

1- कार घेताना तुम्ही कारच्या शोरूम मधून इन्शुरन्स घ्यायचा आहे की बाहेरून हे तुमच्यावर अवलंबून असते. कारण असे  म्हटले जाते की शोरूम ऐवजी जर तुम्ही कारसाठी बाहेरून इन्शुरन्स घेतला तर तो स्वस्त असतो.

जेव्हा तुम्ही कारची डिलिव्हरी घेणार असाल तेव्हा इन्शुरन्सची कागदपत्र तुमच्या सोबत असणे गरजेचे असते तरच कार तुमच्या ताब्यात मिळते. अशा प्रसंगी तुम्ही शोरूम ऐवजी बाहेरून कार इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरू शकते.

2- तसेच तुम्ही एक्सटेंडेड वारंटी देखील काढून घेऊ शकतात अशा प्रकारचे वारंटी घेणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारे तुम्ही कार इन्शुरन्स आणि  एक्सटेंडेड वारंटी काढून टाकली तरी तुमची कारची ऑन रोड किंमत खूपच कमी होते.

 कार खरेदी करताना या गोष्टींची काळजी ठरते फायद्याची

1- तुम्हाला जर कार लोन घेऊन कार खरेदी करायचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या बँका तसेच फायनान्स कंपन्यांचे व्याजदर पाहून व त्यामध्ये तुलना करून जी बँक कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज देईल अशा बँकेची निवड कार लोनसाठी करू शकतात व या माध्यमातून देखील पैसे वाचवू शकतात.

2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून सवलतीच्या ऑफर दिल्या जातात. अशा दिल्या गेलेल्या ऑफर अंतर्गत जर तुम्ही कार खरेदी केली तर तुम्ही पैशांची खूप मोठ्या प्रमाणावर बचत करू शकतात.

अशा सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्ही कारची ऑन रोड प्राईस कमी करू शकतात.

Ajay Patil