Car Care Tips : खरंच काय ! एसी बंद असेल तर वाढते कारचे मायलेज, उत्तर जाणून तुमचाही बसणार नाही विश्वास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Care Tips : अनेकजण स्वतःची कार खरेदी करत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण आता इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहे. परंतु अजूनही काही ग्राहक इंधनावर चालणारी कार खरेदी करत आहेत.

परंतु ग्राहक आता कार खरेदी करण्यापूर्वी ती कार किती मायलेज देत आहे हे सर्वात आधी पाहत आहे. जी कार सर्वात जास्त मायलेज देईल ती कार खरेदी केली जाते. अशातच अनेकांना एसी बंद असेल तर कारचे मायलेज वाढते का? असा सवाल अनेकांना पडत आहे.

एसी वापरला तर इंजिनवर भार येतो

जर तुम्ही कारचा एसी चालवला तर त्याचा इंजिनवर भार पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनही लागतं. अशावेळी गाडीचा मायलेज नक्कीच कमी असतो. असे असताना जर तुम्ही खिडक्या उघड्या ठेवून कार चालवली तर त्याचा फटका तुम्हाला बसेल.

खिडक्या उघड्या ठेवून कार चालवली तर..

समजा तुम्ही कार खिडकी उघडी ठेवून कार चालवली आणि जर तिचा वेग ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास मायलेज वाढण्याऐवजी ते कमी होऊ लागतो. यामागचे कारण असे आहे की ज्यावेळी तुम्ही खिडक्या उघड्या ठेवत असता त्यावेळी हवेचा दाब हा कारला मागे ढकलत असतो आणि इंजिनला कार पुढे नेण्यास भाग पाडत असतो. त्यामुळे इंधनाचा वापर जास्त होऊन मायलेज जास्त लागते.

चालू एसीत गाडी चालवली तर काय होते ? जाणून घ्या

समजा तुम्ही एसी चालवणाऱ्या कारमधून प्रवास केला तर तुमच्या कारचे मायलेज नक्कीच कमी आहे, परंतु जर तुम्ही कारची खिडकी उघडी ठेवली तर खूप मोठा फरक पडेल. यात तुम्हाला प्रति लिटर 2 ते 3 किलोमीटरचा फरक पाहायला मिळू शकतो. उदाहरणार्थ तुमची कार एसीशिवाय 15 किमी प्रति लीटर मायलेज देते, नंतर एसी चालवला तर हा फरक 12 ते 13 किमीवर येतो.