ऑटोमोबाईल

Car Finance Plan : संधीचे करा सोने! अवघ्या 1 लाखात घरी आणा 19.3 Kmpl मायलेज देणारी ‘ही’ कार

Published by
Ahmednagarlive24 Office

Car Finance Plan : बाजारात आता अनेक कार लाँच होत आहेत. ज्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. काही किमती बजेटच्या बाहेर असतात तर काहींच्या किमती खूप कमी असतात. अशातच आता तुम्ही Citroen C3 बेस मॉडेल अवघ्या 1 लाखात घरी आणू शकता. कसे ते पहा.

तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली हॅचबॅक कार खरेदी करण्याच्या विचारात असल्यास पर्याय म्हणून तुम्ही Citroen C3 खरेदी करू शकता. कंपनीने यात शानदार फीचर्स दिले आहेत. जाणून घ्या ऑफर किंमत आणि फीचर्स.

जाणून घ्या किंमत

Citroën C3 Puretec 82 Live variant हे बेस मॉडेल आहे. किमतीचा विचार केला तर या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 6,16,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तसेच ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर 6,91,752 रुपयांपर्यंत जाते.

जाणून घ्या फायनान्स प्लॅन

समजा तुम्ही Citroen C3 कॅश पेमेंटवर खरेदी केल्यास तर त्यासाठी तुमचे बजेट 6.91 लाख रुपये असावे. जर तुमचे इतके बजेट नसेल, तर आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे ही कार 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता.

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 1 लाख रुपये असल्यास या आधारावर बँक या कारसाठी 9.8 टक्के वार्षिक व्याजदरासह 5,94,545 रुपयांचे कर्ज देते.

तसेच हे कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला Citroen C3 बेस मॉडेलसाठी 1 लाख रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे कर्ज सुरू होऊन नंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 12,574 रुपये मासिक EMI जमा करावे लागणार आहेत.

इंजिन आणि मायलेज

हे समजून घ्या की Citroen C3 ला 1198cc इंजिन मिळते जे 5750 rpm वर 80.46 bhp पॉवर आणि 3750 rpm वर 115 Nm चा पीक टॉर्क तयार करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. तर मायलेजबाबत कंपनीचा असा दावा आहे की Citroen C3 एक लिटर पेट्रोलवर 19.3 किलोमीटर मायलेज देत असून हे मायलेज ARAI ने प्रमाणित करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office