ऑटोमोबाईल

Car Modification: मारुती Omni चं बदललं लूक ! आता दिसते 60 लाखांची Toyota सारखी ; पहा व्हिडिओ

Published by
Ahmednagarlive24 Office

Car Modification :  आज भारतासह संपूर्ण जगात जुन्या कार्सना मॉडिफाइड करून नव्या कार्समध्ये बदल करण्याचा ट्रेंड आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज अनेक जण जुन्या कार्स मॉडिफाइड करून लाखो रुपये कमवत आहे.

हे जाणून घ्या कि या व्यवसायमध्ये  कमी पैसे खर्च करून कार्स मॉडिफाय करून चांगल्या किमतीत विकल्या जातात. यातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात कि एका व्यक्तीने चक्क Omni ला मॉडिफाय करून 60 लाख रुपयांच्या टोयोटा लक्झरी एसयूव्हीसारखी केली आहे.

या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि आता अनेक लोक कमेंटमध्ये आपली Old Omni बदलण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. ही कार बाहेरून पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही की ही कार ओम्नी आहे. विशेष म्हणजे आत बसल्यावर महागड्या लक्झरी कारमध्ये बसल्यासारखं वाटतं.

ग्रे क्रीम कलर, चमकदार हेडलाइट्स,  स्ट्रॉंग अलॉय व्हील्स, आरामदायी सीट, सनरूफ आणि मॉडिफाइड एक्सटीरियर यामुळे ही कार लक्झरी कारसारखी दिसते. मारुती ओम्नीचा असा लूक येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. अशी कार बनवण्यासाठी किती खर्च येतो, असेही काही लोक कमेंटमध्ये विचारात आहे.

Ahmednagarlive24 Office