ऑटोमोबाईल

Car News: टोयोटाच्या ‘या’ 8 सीटर कारला आहे प्रचंड मागणी; मागणी पाहून कंपनीने बुकिंग केले बंद, असे काय आहे या कारमध्ये?

Published by
Ajay Patil

Car News:- भारतीय वाहन बाजारामध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या असून या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक नवनवीन वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान युक्त अशा एसयुव्ही सारख्या अनेक कार भारतात लॉन्च केला जात आहे. तसेच भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये एसयूव्ही वाहनांना प्रचंड मागणी व लोकप्रियता आहे.

त्यामुळे अशा प्रकारच्या कारला चांगली मागणी असल्याने मागणीच्या मानाने पुरवठा करणे हा देखील कंपन्यांपुढे एक मोठे आवाहन आहे. जर आपण कारनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर जपानी ऑटो मेकर टोयोटा किर्लोस्कर कंपनी देखील भारतीय वाहन बाजारामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करत असून या कंपनीच्या विविध सेगमेंट मधील कारला प्रचंड मागणी आहे व त्यातल्या त्यात टोयोटाच्या एसयूव्ही वाहने संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.

टोयोटोचे एक वैशिष्ट्य असे आहे की ही कंपनी नवीन गाड्या विकण्याकरिता अगोदर ग्राहकांच्या माध्यमातून बुकिंग घेते  व त्यानुसार उत्पादन करत असते. परंतु टोयोटा कंपनीला अलीकडेच आपल्या आठ सीटर एसयूव्ही इनोव्हा हायक्रॉसच्या ZX आणि ZX(O) या प्रकारांचे बुकिंग थांबवावे लागलेली आहे.

तसे पाहिले तर या दोन्ही प्रकारांची बुकिंग एक महिन्या अगोदर सुरू झालेली होती.परंतु कंपनीच्या या दोन्ही प्रकारच्या वाहनांना जोरदार मागणी असल्याने त्या मागणीनुरूप कंपनी पुरवठा करू शकत नाही व त्यामुळे कंपनीने आता इनोवा हायक्रॉस ZX आणि ZX(O) या प्रकारांचे बुकिंग बंद केले आहे.

 कशा प्रकारचे आहे इनोव्हा हायक्रॉसचे इंजिन आणि प्रकार?

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही दोन इंजिन पर्यायामध्ये येते व यामध्ये 2.0 लिटर मजबूत हायब्रीड इंजिन आणि 2.0 लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे या कारच्या हायब्रीड इंजिन मध्ये ई सीव्हीटी देण्यात आला आहे

व ही कार सात प्रकरामध्ये येते. हे सात प्रकार जर पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने  G, GX, GX(O), VX, VX(O), ZX आणि ZX(O) हे सात प्रकार आहेत. या कारच्या मायलेज बद्दल बोलायचे झाले तर ही कार 24 किलोमीटर पर्यंतचे मायलेज देते.

 इनोव्हा हायक्रॉस ZX ची किंमत किती आहे?

टोयोटा कंपनीच्या इनोव्हा हायक्रॉसच्या ZX व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत तीस लाख 34 हजार रुपये इतकी आहे व ZX(O) व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत तीस लाख 98 हजार रुपये इतकी आहे. एवढेच नाही तर टोयोटा कंपनीने नुकतेच आपले नॉन हायब्रीड GX(O) मॉडेल लॉन्च केले असून त्याची किंमत वीस लाख 99 हजार रुपये इतकी आहे.

Ajay Patil