Tata Motors : मे महिन्याच्या सुरुवातीसह, अनेक आघाडीचे ब्रँड भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची नवीनतम वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात 3 नवीन वाहने भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. फोर्स मोटर्सपासून मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सपर्यंतच्या नवीन फीचर लोड केलेल्या मॉडेल्सची नावे या यादीत आहेत.
जर तुम्ही देखील यावेळी एक उत्तम चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लॉन्च होणाऱ्या या कार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. चला यांच्याशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊया.
टाटा अल्ट्रोझ रेसर
सर्व आधुनिक फीचर्स आणि स्पोर्टी लूकसह टाटा कंपनीची अल्ट्रोज रेसर कार 19 मे रोजी भारतात लॉन्च होणार आहे. लाँच होण्याआधीच, ही कार फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. याशिवाय 6 एअरबॅग्ज, रेन-सेन्सिंग वायपर आणि रिव्हर्सिंग कॅमेरा सारखे फीचर्स 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. टाटाच्या आगामी कार Altroz Racer ची किंमत अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही. पण अशी अपेक्षा आहे की याची सुरुवातीची किंमत सुमारे 10 लाख रुपये असू शकते.
फोर्स गुरखा एसयूव्ही कार
बरेच दिवस लोक फोर्स गुरखा एसयूव्ही कारच्या लॉन्चची वाट पाहत होते. ही ऑफ-रोड SUV सध्याच्या 3-दरवाजा मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि 2 मे रोजी 2 अतिरिक्त दरवाजे आणि आसनांसह लॉन्च करण्यात आली आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात हिरवा, लाल, पांढरा आणि काळा असे चार बाह्य रंग समाविष्ट आहेत. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 16 लाख रुपये असू शकते. 5 डोअर फोर्स गुरखा कंपनी 3 वर्षे/1.5 लाख वॉरंटी सुविधा देखील देत आहे. ज्यामध्ये चार मोफत सेवा आणि रोड साइड असिस्टंटचा पर्यायही उपलब्ध असेल.
नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट
नवीन मारुती स्विफ्टच्या अंतर्गत आणि बाह्य डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन स्विफ्टमध्ये 6 एअरबॅग्ज आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, 9-इंच टचस्क्रीन, ऑटो एसी, 360-डिग्री कॅमेरा यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे नवीन 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z सीरीज पेट्रोल इंजिनसह 82PS प्रति 112Nm क्षमतेसह सुसज्ज आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT ने जोडलेले आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपये असण्याची शक्यता आहे ही चौथी जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट या महिन्यात 9 मे रोजी लॉन्च होणार आहे.