Cheapest 7 Seater Car : देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता ७ सीटर कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक स्वस्त ७ सीटर कार उपलब्ध झाली आहे.
तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी रेनॉल्टची ट्रायबर ही ७ सीटर कार सर्वोत्तम कार ठरू शकते. या कारची किंमत देखील खूपच कमी असल्याने ग्राहक सहज ७ सीटर कार खरेदी करू शकतात.
रेनॉल्ट ट्रायबर ८ व्हेरियंट आणि आकर्षक रंग पर्यायामध्ये उपलब्ध
तुम्हीही रेनॉल्ट ट्रायबर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारमध्ये अनेक आकर्षक रंग पर्याय मिळतील. तसेच या कारमध्ये ८ व्हेरियंट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही कार खरेदी करू शकता.
12,000 लॉयल्टी सवलत दिली जात आहे
रेनॉल्ट ट्रायबर कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपये आहे. तसेच या कारवर ३१ जुलै २०२३ पर्यंत ५२,००० रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 15,000 रुपयांची रोख सूट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 12,000 रुपयांची लॉयल्टी सूट दिली जात आहे.
रेनॉल्ट ट्रायबर इंजिन
कारमध्ये 182 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. तसेच कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये 999 cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 71.01 Bhp पॉवर आणि 96Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिअल-टाइम अलर्ट
रेनॉल्ट ट्रायबर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रिअल-टाइम अलर्टचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. कारप्लेसह 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायसह ही ७ सीटर कार उपलब्ध आहे.
कारला 999 cc चे इंजिन आहे. कारचा टॉप व्हेरिएंट 8.97 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. यात टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रिअल-टाइम अलर्टचे वैशिष्ट्य आहे. याला सेंटर कन्सोल आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये थंड स्टोरेज देखील मिळते.