Cheapest 7 Seater Cars : बजेटमधील फॅमिली कार! देशातील या चार ७ सीटर कार आहेत 10 लाखांपेक्षा स्वस्त, पहा किंमत आणि मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest 7 Seater Cars : देशात सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कंपन्यांकडून मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र काही ७ सीटर कारच्या किमती अधिक असल्याने कमी बजेट ग्राहक अशा कार खरेदी करू शकत नाहीत.

मात्र देशातील ऑटो क्षेत्रात अशा काही स्वस्त 7 सीटर कार उपलब्ध झाल्या आहेत ज्या कमी बजेट ग्राहक देखील खरेदी करू शकतात. देशात ४ अशा ७ सीटर कार उपलब्ध आहेत ज्यांच्या किमती 10 लाख रुपयांपेक्षा देखील कमी आहेत.

खालील 7 सीटर कार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत

मारुती सुझुकी एर्टिगा

देशातील ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी कंपनीचे वर्चस्व आहे. याच कंपनीची एर्टिगा ही 7 सीटर कार सर्वाधिक विकली जात आहे. 7 सीटर कारच्या विक्रीमध्ये एर्टिगा पहिल्या क्रमांकावर आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच मारुती एर्टिगा कारमध्ये 1462 cc इंजिन देण्यात येत आहे. ही कार 20.51kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत आजही देशातील ऑटो क्षेत्रात अव्वल स्थानी आहेत. मारुतीच्या Eeco या 7 सीटर कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.56 लाख रुपये आहे. तसेच ही कार 16.11 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा कंपनीची बोलेरो ही कार देखील भारतीय ऑटो क्षेत्रात अधिक लोकप्रिय 7 सीटर कार बनली आहे. ज्यांची फॅमिली मोठी आहे अशा ग्राहकांसाठी बोलेरो ही 7 सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 9.78 लाखांपासून सुरू होते. तसेच या कारमध्ये 1498 सीसी इंजिन देण्यात येत आहे. ही कार प्रति लिटर 16 किलोमीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

Renault Triber

कमी बजेटमधील आणि शानदार फीचर्स असलेली 7 सीटर कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी रेनॉल्ट ट्रायबर ही कार सर्वोत्तम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरु होते तर या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारमध्ये कंपनीकडून 999 सीसी इंजिन देण्यात आले जे 18.2 ते 20.0 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.