ऑटोमोबाईल

Cheapest Bike: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त व 1 लिटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटरपेक्षा जास्त धावणाऱ्या बाईक, वाचा यादी

Published by
Ajay Patil

Cheapest Bike:- व्यक्ती जेव्हा कोणत्याही प्रकारचे वाहन घ्यायला जातो तेव्हा सगळ्यात अगोदर स्वतःच्या आर्थिक बजेट तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये वाहनामध्ये कोणकोणती फीचर्स मिळत आहेत या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. व्यक्तीचा मुळात स्वभावाच असा आहे की कमीत कमी किमतीत आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

हीच बाब वाहन खरेदी किंवा बाईक खरेदी करताना देखील आपल्याला दिसून येते. यामध्ये जर आपण बाईक म्हणजेच मोटरसायकलचा विचार केला तर बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या बाईक उपलब्ध आहेत.

त्यामुळे बऱ्याचदा ग्राहकांना बाईक खरेदीसाठी निवड करताना  मोठा गोंधळ उडताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण या लेखांमध्ये अशा काही मोटरसायकलची माहिती घेणार आहोत ज्या साधारणपणे 80 हजार रुपये किमतीत मिळतात व मायलेज देखील उत्तम देतात.

 या आहेत भारतातील चांगले मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक

1- हिरो सुपर स्प्लेंडर हिरो सुपर स्प्लेंडर ही एक खूप फायद्याची बाईक असून जे लोक दररोज कार्यालयामध्ये नोकरीसाठी जातात अशा लोकांसाठी ही मोटरसायकल खूप फायद्याचे आहे. या मोटरसायकलमध्ये कंपनीने 124.7cc इंजिन दिले असून जे 10.7 बीएचपी आणि 10.6 एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच हे इंजिन पाच स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे. जर आपण ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते ही बाईक 55 किलोमीटर पर लिटर मायलेज देते.

या मोटरसायकलच्या समोरच्या टायरमध्ये 240mm डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये 130 एमएम ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. तसेच या मोटरसायकलमध्ये 18 इंच ट्यूबलेस टायर देण्यात आले असून या बाईकची किंमत 80 हजार रुपयांपासून सुरू होते.

2-Honda CB Shine- होंडा शाइन 125 ही सर्वोत्तम विक्री होणारे मोटरसायकल असून ही 124cc SI इंजिन सह सुसज्ज असून ती 7.9 kW चा पावर आणि अकरा एनएम टॉर्क जनरेट करते.

तसेच या बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्सची सुविधा देण्यात आली असून ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 55 किमीचे मायलेज देते. या बाईकमध्ये 18 इंच ट्यूबलेस टायर देण्यात आले असून या बाईकची किंमत 79 हजार रुपयांपासून सुरू होते.

3- टीव्हीएस स्टार सिटी प्लस टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी प्लस ही एंट्री लेव्हल सेगमेंट मध्ये एक चांगली आणि विश्वासार्ह बाईक म्हणून प्रसिद्ध आहे तसेच रोजच्या वापराकरिता ही बाईक उत्तम ठरते. या बाईकमध्ये 110cc इंजिन देण्यात आले असून जे ८.०८ बीएचपी पावर आणि 8.7nm टॉर्क जनरेट करते व हे इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

या बाईकमध्ये इको थर्स्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान वापरल्यामुळे ही बाईक तिच्या सेगमेंट मधील ज्या इतर बाईक्स आहेत त्यापेक्षा साधारणपणे 15 टक्के जास्त मायलेज देईल. या बाईकचा ताशी स्पीड 90 किलोमीटर आहे व मायलेज 66 किलोमीटर पर लिटर इतके आहे. या बाईकची किंमत 78 हजार रुपयांपासून सुरू होते.

Ajay Patil