ऑटोमोबाईल

सर्वात स्वस्त 6 एअरबॅगवाल्या टॉप 3 कार आणि त्यांच्या विशेषता पहा….

Published by
Ahmednagarlive24 Office

6 Airbag Cars : तुम्हालाही नवीन Car खरेदी करायची आहे का ? हो मग थांबा, शोरूमला जाण्याआधी आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. खरेतर, भारतात गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षित कार खरेदीला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे.

सेफ्टी कारची भारतात मोठी डिमांड आहे. यामुळे अनेक कार निर्मात्या कंपन्यानी आता सेफ्टी कार लाँच केल्या आहेत. बहुतेक ऑटो दिग्गज कंपन्या आता त्यांच्या कारमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध करून देत आहेत. विशेष बाब म्हणजे इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला 6 एअरबॅगच्या अनेक स्वस्त कार देखील पाहायला मिळतील.

दरम्यान आज आपण भारतीय कार बाजाराटीप 3 लोकप्रिय सेफ्टी कारची माहिती जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 मॉडेल्सबाबत माहिती सांगणार आहोत ज्या कारमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग मिळणार आहेत.

विशेष म्हणजे या सर्वांच्या एक्स-शोरूम किंमती 7.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आमची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वात स्वस्त टॉप तीन कार.

Hyundai Grand i10 Nios : ह्युंदाई ही एक लोकप्रिय ऑटोमेकर कंपनी. कंपनीच्या अनेक गाड्या भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. Hyundai Grand i10 Nios ही देखील कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात जास्त विक्री होणारी कार म्हणून ओळखली जाते. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये एवढी आहे. असे म्हटले जाते की ही कार इंडियन मार्केट मधील सर्वात स्वस्त 6 एअर बॅग असणारी कार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, कंपनीने या गाडीच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध करून दिले आहेत. या गाडीत 1.2-लीटर कप्पा पेट्रोल मोटर आहे. हे 83 PS ची कमाल पॉवर आणि 113.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो AMT समाविष्ट आहे. यात टाइप सी फ्रंट यूएसबी चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे. इतर अद्यतनांमध्ये ग्लॉसी ब्लॅक फ्रंट रेडिएटर ग्रिल, नवीन एलईडी डीआरएल आणि कनेक्ट केलेल्या डिझाइनसह एलईडी टेल लॅम्प समाविष्ट आहेत.

ह्युंदाई एक्सेटर : ह्युंदाई कंपनीची ही आणखी एक सर्वात स्वस्त सहा एअर बॅग असणारी कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये आहे. यात 1.2 पेट्रोल एमटी इंजिन असेल. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री, सर्व आसनांसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, एलईडी टेल लॅम्प, बॉडी कलर बंपर, 4.2-इंच एमआयडी असलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एकाधिक प्रादेशिक UI भाषा, फ्रंट पॉवर विंडोज, ॲडजस्टेबल रीअर हेडरेस्टस्, मॅन्युअल एसी, ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंट, रीअर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (फक्त EX (O)), हिल स्टार्ट असिस्ट (फक्त EX (O)) आणि वाहन स्थिरता व्यवस्थापन (EX) (O) फक्त). यात डॅशकॅम, फ्रंट आणि रिअर मडगार्ड, ब्लू लिंकसह 8-इंच टचस्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट कार : मारुती स्विफ्ट ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकीची नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट कार ही कंपनीची सर्वात स्वस्त सहा एअरबॅग असणारी कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपये आहे. कंपनीने हे 6 प्रकारात LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi+ आणि ZXi+ ड्युअल टोनमध्ये सादर केले आहे. यात सापडलेले अगदी नवीन 1.2-लिटर Z12E 3-सिलेंडर NA पेट्रोल इंजिन 80bhp पॉवर आणि 112nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत. त्याच्या मॅन्युअल वेरिएंटचे मायलेज 24.80kmpl आहे आणि ऑटोमॅटिकचे मायलेज 25.75kmpl आहे. सुरक्षिततेसाठी, यात सर्व प्रकारांसाठी हिल होल्ड कंट्रोल, ईएसपी, नवीन सस्पेंशन आणि 6 एअरबॅग्ज मिळतील. यात क्रूझ कंट्रोल, सर्व आसनांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ब्रेक असिस्ट (BA) यासारखी अप्रतिम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Ahmednagarlive24 Office