Citroen Basalt Vision : Citroen ही भारतातील लोकप्रिय कारपैकी एक आहे. अशातच आता कपंनी आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, या कार कडून देखील लोकांच्या खूप अपेक्षा आहे. कंपनीची नवीन कार Basalt Vision SUV नुकतीच टेस्टिंग दरम्यान रस्त्यांवर स्पॉट झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिपोर्टनुसार, कंपनी ही कूप स्टाइल एसयूव्ही भारत 2024 च्या उत्तरार्धात लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार, Citroen Basalt ही जवळपास Citroen C3 Aircross सारखीच आहे.
कपंनी Citroen Basalt मध्ये आकर्षक वैशिष्ट्ये देणार आहे, Citroen च्या C3 Aircross SUV प्रमाणे, नवीन Basalt मध्ये आकर्षक अलॉय व्हील्स दिसतील. याशिवाय एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलाइट्स इत्यादी वैशिष्ट्ये पहायला मिळतील.
यात कीलेस एंट्री, पुश-बटण स्टार्ट, हवेशीर आसनांसह अनेक आधुनिक सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. सुरक्षिततेसाठी, यामध्ये 6 एअरबॅग्ज, ISO फिक्स पॉइंट आणि सीट बेल्ट रिमाइंडर मानक म्हणून दिले जाण्याची शक्यता आहे.
अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ते सिंगल-पेन सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह 10.1-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि ब्लोअरसह छतावर माउंट केलेले मागील एसी व्हेंटसह येईल.
इंजिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यात 1.2 लीटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळवू शकते, हे इंजिन 110 PS पॉवर आणि 190 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
कंपनीच्या मते, हे शक्तिशाली आणि स्टायलिश मॉडेल ग्राहकांना सर्वोत्तम कूप अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. बेसॉल्ट व्हिजन प्रमुख बाजारपेठांमध्ये Citroën C-3 आणि C-3 एअर क्रॉससह कंपनीची लाइनअप आणखी मजबूत करेल. याच्या किंमतीबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ती Citroen C3 Aircross च्या आसपासच्या किंमतीत लॉन्च करण्यात येईल.