महिंद्रा XUV 700 शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ 3 SUV मार्केटमध्ये उडवत आहेत खळबळ, फीचर्स खूपचं भारी!

Content Team
Published:
Mahindra XUV 700

Mahindra XUV 700 : महिंद्राची XUV 700 लॉन्च झाल्यानंतर भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. कंपनीने 2021 मध्ये Mahindra XUV 700 लाँच केले होते. लॉन्च झाल्यापासून 2 दिवसात, Mahindra XUV700 ला 50,000 पेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या होत्या. आता अलीकडे महिंद्र XUV 700 ने आणखी एक यश संपादन केले आहे. लॉन्च झाल्यापासून 33 महिन्यांत, Mahindra XUV700 ने भारतात 2,00,000 SUV विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. असे असले तरी देखील भारतीय बाजारपेठेत Mahindra XUV 700 ला या 3 SUV जोरदार टक्कर देत आहे. कोणत्या या SUV पाहूया…

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N ही भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय SUV आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही देखील आहे. Mahindra Scorpio N मध्ये पॉवरट्रेन म्हणून 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन आहे. भारतीय बाजारात महिंद्र स्कॉर्पिओची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.6 लाख ते 24.54 लाख रुपयांपर्यंत आहे.

Tata Safari

टाटा सफारी ही कंपनीची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहे. Tata Safari ला देखील ग्लोबल NCAP ने कौटुंबिक सुरक्षेसाठी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिले आहे. पॉवरट्रेन म्हणून, टाटा सफारीमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे जे जास्तीत जास्त 168bhp पॉवर आणि 350Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. टाटा सफारीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख ते 27.34 लाख रुपयांपर्यंत आहे.

Hyundai Alcazar

Hyundai Creta प्रमाणे, Alcazar देखील कंपनीच्या लोकप्रिय SUV पैकी एक आहे. सध्या, ग्राहकांना 6 आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये Hyundai Alcazar मिळत आहे. Hyundai Alcazar मध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन आणि 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. Hyundai Alcazar ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 16.77 लाख ते 21.28 लाख रुपयांपर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe