Toyota Hyryder : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीसोबत करार केला आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीने त्यांच्या अनके कार सादर केल्या आहेत. या कारमध्ये मजबूत इंजिन आणि प्रीमियम वैशिष्ट्ये दिली आहेत.
टोयोटा कार उत्पादक कंपनीने त्यांची अर्बन क्रूझर हायरायडर एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये हायब्रीड, पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.
तुम्हीही टोयोटा हायरायडर एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याआधी कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. टोयोटाची Hyryder एसयूव्ही कार खरेदी करण्यासाठी 5 ते 6 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर तुम्ही आज Hyryder एसयूव्ही कार खरेदी केली तर तुम्हाला 5 ते 6 महिन्यांची वाट पाहावी लागेल.
टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर
टोयोटा कार उत्पादक कंपनीची Hyryder एसयूव्ही कार मारुती ग्रँड विटाराशी स्पर्धा करते. हायरायडर कारचे डिझाईन आकर्षक बनवण्यात आले आहे. कारचे हायब्रीड आणि सीएनजी व्हेरियंट 27.97 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर पेट्रोल व्हेरियंट 19 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर इंजिन
टोयोटाकडून त्यांच्या अर्बन क्रूझर हायराइडर एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर माईल्ड हायब्रिड इंजिन आणि 1.5 लीटर मजबूत हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्राइव्ह पर्याय देखील देण्यात आला आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर वैशिष्ट्ये
हायराइडर एसयूव्ही कारमध्ये प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, अॅम्बियंट लाइटिंग, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरॅमिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, स्मार्टफोन, वाहन स्थिरता नियंत्रण अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑल-व्हील डिस्क ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट अँकर असे सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.
टोयोटा अर्बन क्रूझर Hyrider किंमत
टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Hyrider कारची किंमत देखील देखील कमी ठेवण्यात आली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.86 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 20 लाख रुपयांपर्यंत जाते.