Honda Elevate : होंडा कपंनी आपल्या विविध वाहनांवर सध्या मोठी सूट देत आहे. कपंनीच्या Honda Elevate वर सध्या 55,000 रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत आणि लॉयल्टी बोनसचा देखील समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत Elevate ची किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये दरम्यान आहे.
तसेच Honda Amaze खरेदी करून तुम्ही 96 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तर त्याच्या एंट्री लेव्हल मॉडेलवर 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 12,349 रुपयांपर्यंतच्या मोफत ॲक्सेसरीजचा देखील लाभ घेऊ शकता. कपंनी इतर प्रकारांवर, 20 हजार रुपयांची रोख सवलत, 10 हजार रुपयांची एक्सचेंज आणि 4000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे.
सध्या Honda Amaze च्या एलिट एडिशनवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच Amaze वर 24,346 रुपयांच्या पर्यायी मोफत ॲक्सेसरीजचाही लाभ घेता येईल.
Honda City Hybrid वर 65 हजार रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. होंडा सिटी पेट्रोलवर 1.14 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. यामध्ये रोख सवलत, पर्यायी मोफत ॲक्सेसरीज आणि इतर ऑफर्स यांचा समावेश आहे.
Honda Cityच्या एलिगंट एडिशनवर 36,500 किमतीचे फायदे उपलब्ध आहेत. होंडा कारवर 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 8,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 20,000 रुपयांची विशेष सूटही दिली जात आहे.