Maruti Suzuki Eeco : जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. विशेषता मारुती सुझुकीची इको कार खरेदी करणाऱ्यांसाठी आजची बातमी खास राहणार आहे. ही कंपनीची एक लोकप्रिय कार असून दर महिन्याला या गाडीचे दहा हजार युनिट विकले जात आहेत.
दरम्यान या लोकप्रिय कारवर कंपनीकडून हजारो रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना ही कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या कारवर फेब्रुवारी 2024 मध्ये कंपनीकडून तब्बल 29 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी मॉडलमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान या दोन्ही मॉडेलवर सूट दिली जात आहे. ही गाडी Shell आणि ॲम्बुलन्स कार्गो या व्हेरिएंटमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आपण कोणत्या व्हेरिएंटवर किती डिस्काउंट मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
मारुती ईको पेट्रोल शेल अँड ॲम्बुलन्स व्हेरिएंट : या गाडीवर 29 हजार रुपयांचा डिस्काउंट आहे. यामध्ये कॅश डिस्काउंटचे 15000, एक्सचेंज बोनसचे 10 हजार आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या चार हजार रुपयांचा समावेश आहे.
मारुती ईको पेट्रोल कार्गो व्हेरिएंट : या गाडीवर पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंटचे 15 हजार आणि एक्सचेंज बोनसचे 10 हजार यांचा समावेश आहे.
मारुती ईको CNG : या गाडीवर 24 हजाराचा डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये दहा हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट, दहा हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि चार हजार रुपयाच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
मारुती ईको कार्गो CNG :
या गाडीवर वीस हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये दहा हजार रुपयांच्या कॅश डिस्काउंटचा आणि दहा हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.