कार डिलिव्हर करताना डीलरशिप मोठ्या बनावट चावीसोबत ग्राहकाचा फोटो क्लिक करतात. हे खूप सामान्य झाले आहे. आपण अनेकदा पाहिले असेल की जेव्हा लोक नवीन कार खरेदी करतात तेव्हा ते सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करतात,
ज्यामध्ये ते कारसमोर उभे असतात आणि त्यांना डीलरशिपकडून मोठी चावी दिली जाते. आपण कधी विचार केला आहे का की डीलर असे का करतात? खरं तर, ही एक मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे. चला, त्याबद्दल जाणून घेऊयात –
सेलिब्रेट –असे करून डीलरशिप ग्राहकांना जाणीव करून देते की त्यांनी नवीन कार खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तो सेलिब्रेट केला पाहिजे. या सेलिब्रेशनसाठी त्याचा फोटो मोठी नकी चावी देऊन क्लिक केला जातो. यातून एक प्रकारचे सेलिब्रेशन देखील होते.
संस्मरणीय आठवण बनवणे –नवीन कार खरेदी करणे ही मोठी गुंतवणूक आहे. हा अनुभव संस्मरणीय बनवण्यासाठी ग्राहक अनेकदा उत्सुक असतात. त्यामुळे ग्राहक त्यांच्या नवीन कारबद्दल किती उत्साही आहेत हे दाखवण्यासाठी मोठी किल्ली असलेले फोटो हा एक उत्तम मार्ग आहे.
ब्रँडिंग- मोठी चावी ही कंपनीचे ब्रँडिंग करते. मोठ्या चावीवर कार कंपनीचा लोगो असतो. ग्राहक हा फोटो सुरक्षित ठेवतात आणि कार कंपनीचा लोगो नेहमीच त्यांच्यासोबत असतो. तसेच विविध ठिकाणी ते फोटो शेअर करतात. त्यातून आपोआपच कंपनीची जाहिरात होते.
फ्री प्रमोशन – लोक त्यांच्या कार खरेदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अशावेळी मोठ्या चावीवर कंपनीचा लोगो लावून त्यांना फ्री प्रमोशन मिळते. यामुळे कंपनीची जाहिरात अनेक ठिकाणी अगदी फ्री मध्ये होते.
मार्केटिंग फंडा- आजकाल प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग करावी लागते. त्यासाठी अनेक कंपन्या लाखो रुपये खर्च करत असतात. त्यामुळे कंपनीचा खप देखील वाढतो. त्यामुळे अशा पध्दतिचीमठी नकली चावी देऊन फोटो काढणे हा एक मार्केटिंचा फंडाच आहे. प्रथम ही आयडिया मोठमोठ्या कंपन्या वापरायच्या. आता ही आयडिया जवळपास सर्वत्रच वापरली जाते.