आता भारतात येणार हवेतून उडणाऱ्या इलेकट्रीक एअर टॅक्सी, ६० मिनिटांचा प्रवास ७ मिनिटात होईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Air Taxi : ट्रॅफिक खूप आहे..प्रदूषण तर इतकं झालं आहे की काही सांगायला नको..ट्रॅफिकमुळे ऑफिसमध्ये जायला उशीर होतो.. असे अनेक वाक्ये तुम्ही दररोज ऐकत असाल. किंवा स्वतः अनुभवत असाल.

परंतु यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्राफिक. यात जर तुम्हाला उडणाऱ्या अर्थात एअर टॅक्सीची मदत दिली तर ? वाढून अचंबित झाले असतात ना ? पण हे जरी आता स्वप्नवत वाट असले तरी लवकरच भारतामध्ये ऑल-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

एयरलाइन इंडिगो समर्थित इटरग्लोब एंटरप्रायजेस आणि अमेरिकेतील आर्चर एव्हिएशन २०२६ मध्ये ऑल-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे कंपनीने हे देखील सांगितलं आहे की, त्याचे संचालन किंवा प्रवास हा अत्यंत परवडणाऱ्या दरात होईल. जर या कंपन्यांना सर्व गोष्टींची मान्यता मिळाली तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात परिवहन क्षेत्रातील उपायांची गरज भागविण्यासाठी ते काम करणार आहेत.

दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू या तीन शहरांत सुरू होणार ‘ही’ सेवा

क्रिसलर-पैरेंट स्टेलंटिस ही कंपनी बोईंग विमाने आणि युनायटेड एअरलाइन्स द्वारे संचालित आर्चर एव्हिएशन ही इलेक्ट्रिक वर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (eVTOL) विमाने बनवते. हे ‘मिडनाईट’ ई-विमान चार प्रवासी आणि एक पायलट 100 मैल (सुमारे 161 किलोमीटर) पर्यंत नेऊ शकते. ही सेवा राष्ट्रीय राजधानी दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथे सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

जेथे ६० मिनिट लागतात तेथे ७ मिनिटे लागतील

हा प्रवास अगदी फास्ट असेल. उदाहरण द्यायचे झाले तर दिल्लीत कारने प्रवास करण्यासाठी जेथे साधारणत: ६० ते ९० मिनिटे लागतात, एअर टॅक्सीने सुमारे ७ मिनिटात तुम्ही पोहोचाल. त्यामुळे आता आगामी काळात तुम्ही हवेतून प्रवास कराल.

हा प्रवास अगदी फास्ट देखील असेल व परवडणारा देखील असेल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.