Electric Car:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून या वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे स्कूटर्स तसेच दुचाकी कारचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही इलेक्ट्रिक वाहने फायद्याचे असल्याने सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन देण्यात येत असून
देशामध्ये नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी आणण्यात आलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारांच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. तसेच सरकारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यात येत असल्यामुळे कंपन्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यामुळे मदत झालेली आहे. याच अनुषंगाने जर आपण यावर्षाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या वर्षाच्या अखेरपर्यंत 14 नव्या कारचे मॉडेल लॉन्च होणार आहेत.
डिसेंबरपर्यंत लॉन्च होणार 14 इलेक्ट्रिक कार
या वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुमारे 14 नवे इलेक्ट्रिक कार मॉडेल लॉन्च होणार असून नोमूरा तसेच ग्लोबल डेटा आणि टॉरस प्रायव्हेट वेल्थ यासारख्या डेटा अनालिटिक्स कंपनी आणि ब्रोकरेज फर्म्सच्या मते, त्यामुळे दहा ते पंधरा लाखा दरम्यान कारांचे भाव एक ते दीड लाख रुपये कमी होतील.
यामध्ये प्रीमियम कार अधिक स्वस्त व परवडणाऱ्या असतील तर सर्वात स्वस्त इम्पोर्ट इलेक्ट्रिक कार ऑन रोड 51 लाख असेल. यामध्ये आत्तापासूनच दरात घसरण व्हायला सुरुवात झालेली असून टाटा मोटर्सने नेक्सन ईव्हीची किंमत 1.2 रुपयांनी कमी केली आहे. आता तिची एक्स शोरूम किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच आता टियागो ईव्हीची किंमत 7.99 लाख रुपयापासून सुरू झाली असून त्यामध्ये 70 हजार रुपयांची कपात केली आहे.
कोणत्या कंपनीची इलेक्ट्रिक कार केव्हा येईल बाजारपेठेत?
1- मारुती
सुझुकी– मारुती सुझुकी ही आघाडीची कार उत्पादक कंपनी यावर्षी डिसेंबर पर्यंत त्यांची पहिली वहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ईव्हीएक्स पासून याची सुरुवात होणार असून ज्याची एक्स शोरूम किंमत 22 लाख रुपये ठेवली जाण्याची शक्यता आहे.2- महिंद्रा अँड महिंद्रा– महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने ईव्हीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म इनग्लो बनवला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे व यातील पहिली एसयूव्ही या वर्षी डिसेंबर मध्ये येणार आहे.
3- टाटा– सध्या टाटा मोटर्सच्या टियागो, नेक्सन, पंच आणि टिगोर या लाइनअपसह सध्या बाजारात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. भारतीय इलेक्ट्रिक वेहिकल्स बाजारात टाटा मोटर्स तब्बल 72 टक्के वाटा आहे आणि टाटा मोटर सारख्या कंपन्यांची कमी किमतीच्या कार मार्केटमध्ये अधिक पोहोच आहे.