Electric Scooter : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढलेली दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांनी दमदार इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली. TVS ची iqube ही एप्रिल महिन्यात बेस्ट सेलिंग स्कुटर ठरली आहे.
टिव्हीएसची डिमांड वाढली
TVS कंपनीने एप्रिलमध्ये पहिल्यांदाच धडाकेबाज कामगिरी केली. गेल्या महिन्यात या कंपनीने आपल्या 91,791 गाड्यांची विक्री केली. जी वार्षिक 40% जास्त आहे. एप्रिल 2023 मध्ये टीव्हीएसने 66,878 गाड्या विकल्या होत्या. यावर्षी कंपनीने मागील विक्रम मोडला. हे सर्व विक्रीचे आकडे वाहन डेटाबेसवर आधारित आहेत. एप्रिल 2025 मध्ये टीव्हीएसच्या विक्रीत टीव्हीएस मोटरने अव्वल स्थान पटकावले.

कशी आहे गाडी
TVS च्या iQube स्कुटरमध्ये इलेक्ट्रिक २.२kWh बॅटरी आहे. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ८९,९९९ रुपये पासून सुरू होते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 75 किमी चालते. विशेष म्हणजे 0 ते 80 % चार्जिंग होण्यास 2 तास 45 मिनिटांचा वेळ लागतो. ही स्कुटरसाठी पर्ल व्हाइट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे ग्लॉसी या तीन रंगात उपलब्ध आहे.
आयक्यूबचे आहेत 3 माँडेल्स
TVS iQube ची विक्री iQube, iQube S आणि iQube ST या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये केली जाते. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा न काढता येण्याजोगा बॅटरी पॅक दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार पूर्ण चार्ज केल्यावर ते माँडेल 145 किलोमीटरची रेंज देते. माहितीनुसार हा बॅटरी पॅक बदलण्याची किंमत 56,000 ते 70,000 रुपये आहे. कंपनी बॅटरीवर 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देते. यानंतर जर बॅटरी खराब झाली तर त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला सहन करावा लागेल.
ओला-चेतकचे मार्केट खाली
TVS ने ओला इलेक्ट्रिकला 27 युनिट्सने मागं टाकले. ओलाने एप्रिलमध्ये 19,736 युनिट्सची विक्री केली. अक्षय्य तृतीयेला ओलाने 1,534 युनिट्सची विक्री केली. टीव्हीएसने कोणत्याही दुचाकी ईव्ही कंपनीने एका दिवसात सर्वाधिक विक्री नोंदवली. वाद आणि डीलरशिपच्या खराब अनुभवामुळे नाराज असलेले ग्राहक ओला इलेक्ट्रिकपासून दूर गेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बजाज ऑटो आहे. चेतकच्या 19,001 युनिट्सची विक्री झाली. बजाज ऑटोने अक्षय तृतीयेला 1,258 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या.