Electric Scooters : शानदार फीचर्स आणि 212 किमी रेंज! कमी किमतीत खरेदी करता येतील ‘या’ स्कुटर्स, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Scooters : सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. बाजारपेठेची ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या शानदार इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करू लागल्या आहेत. ग्राहक इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असताना रेंजचा विचार करतात.

बाजारात अशा अनेक इलेक्ट्रिक स्कुटर आहेत ज्या उत्तम रेंज देतात. विशेष म्हणजे यात तुम्हाला उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. शिवाय या इलेक्ट्रिक स्कुटर्स तुमच्या बजेटमध्येही येतील. त्यामुळे तुम्ही त्या सहज खरेदी करू शकता. पहा त्यांची यादी.

या 5 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळेल शानदार रेंज

सिंपल वन:

या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर तुमची मागणी पूर्ण करेल. विशेष म्हणजे ही स्कुटर दोन बॅटरी पॅकसह येते. यापैकी एक निश्चित बॅटरी पॅक आहे, तर दुसरा काढता येण्याजोगा बॅटरी पॅक दिलेला आहे. अशा प्रकारे बॅटरी पॅकची एकूण शक्ती 5kWh इतकी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर तब्बल 212 किमी अंतर जाऊ शकते.

Ola S1 Pro:

दुसरी Ola S1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही स्कुटर देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात ग्राहकांना अनेक उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहायला मिळतात. खरंतर Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर 4kWh बॅटरी पॅकसह येते. जी एकदा पूर्ण चार्ज झाली की १८१ किमी अंतर कापते.

Ola S1 Pro Gen 2:

Ola ने नुकतेच Ola S1 Pro Gen 2 लॉन्च केली आहे. हे लक्षात घ्या की ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ही अपडेटेड व्हर्जन असून यात 4kWh बॅटरी पॅकची शक्ती मिळते. Ola S1 Pro Gen 2 इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 195 किमी अंतर कापू शकते.

Ather 450X Gen 3:

Ather ची ही एक अतिशय शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर असून ती बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जाते. Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटरला 3.7kWh बॅटरी पॅकची शक्ती मिळेल. कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटरला एका चार्जवर 150 किमी पेक्षा जास्त रेंज ग्राहकांना मिळत आहे.

Hero Vida V1 Pro:

Hero भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची चांगली रेंज देते. Vida V1 Pro 3.94kWh बॅटरी पॅकसह येत असून या कंपनीच्या मतानुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 165 किमी धावते.