ऑटोमोबाईल

देसी कंपनीने लॉन्च केली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक Cyborg GT 120, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- इंडियन इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) कंपनी Ignitron Motocorp ने बाजारात तिसरी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक Cyborg GT 120 लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक सायबोर्ग ब्रँडच्या नावाने सादर करण्यात आली आहे.

कंपनीने यापूर्वी दोन इलेक्ट्रिक दुचाकी Cyborg Yoda आणि Bob-E भारतात लॉन्च केल्या आहेत. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक बाइक उच्च कार्यक्षमता आणि सुपर बाइक डिझाइनसह सादर करण्यात आली आहे.

Cyborg GT-120 स्पेसिफिकेशन्स :- Cyborg GT-120 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक 4.68 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे सपोर्टिव्ह आहे. यासोबतच याचा टॉप स्पीड 125kmph आहे. ही बाईक एका चार्जमध्ये 180 किमीची रेंज देते. ही इलेक्ट्रिक बाईक फक्त 2.5 सेकंदात 0 ते 40 किमी/ताशी वेग पकडू शकते.

बाइकमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन राइडिंग मोड आहेत. या बाईकमध्ये टेलीस्कोपिक फोर्क अप-फ्रंट आणि पूर्णपणे समायोजित करता येण्याजोगा मोनो रिअर शॉकर आहे.

Cyborg GT-120 इलेक्ट्रिक बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात जिओ लोकेट/जिओ-फेन्सिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस स्टार्ट (रिमोट कंट्रोल) आणि डिजिटल क्लस्टर यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक बाइकला पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

इलेक्ट्रिक बाइकमध्ये 15 amp चा फास्ट होम चार्ज देण्यात आला आहे. Cyborg GT-120 इलेक्ट्रिक बाइक ब्लॅक आणि डार्क पर्पल कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office