EV vehicle Loan:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल वाढताना आपल्याला दिसून येत असून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. सध्या इलेक्ट्रिक दुचाकी तसेच इलेक्ट्रिक कार अनेक कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जात असून ग्राहकांची देखील आता या वाहनांना पसंती असल्याचे दिसून येत आहे.
तसेच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून देखील प्रयत्न करण्यात येत आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे आता जर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे असेल तर सरकारी बँकेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनासाठी कर्ज देण्यात येणार असून याकरिता विशेष कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे इलेक्ट्रिक वाहनांवर कर्ज
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांकरिता विशेष कर्ज योजना सुरू केली असून आता इलेक्ट्रिक कारच्या काही विशिष्ट प्रकारच्या मॉडेलवर 100% कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याचाच अर्थ तुम्ही अगदी शून्य डाऊन पेमेंट देऊन देखील नवीन इलेक्ट्रिक कार आपल्या घरी नेऊ शकतात. तर यामध्ये काही मॉडेल्स वर ऑन रोड किमतीच्या 90% पर्यंत देखील कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
किती असणार आहे यावर व्याजदर?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विशेष कर्ज योजनेतून जे कर्ज घ्याल त्याचा परतफेडचा कालावधी तीन ते आठ वर्षाचा असणार असून स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य कार साठी 8.85 ते 9.80% व्याजदर आकारात आहे
तर इलेक्ट्रिक कारसाठी हा व्याजदर 8.75 ते 9.45% इतका आहे. यावरून आपल्याला दिसून येते की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कारसाठी असलेल्या कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजदरावर 0.25% पर्यंत सूट देत आहे.
कुणाला मिळू शकते किती कर्ज?
यामध्ये व्यक्तींना असणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणावर आधारित वेगवेगळे कर्ज मिळू शकते. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचे वार्षिक वेतन कमीत कमी तीन लाख रुपये असेल तर तुम्हाला तुमची महिन्याला जी पगार असेल त्या पगाराच्या 4 पट रक्कम कर्ज स्वरूपात मिळणे शक्य आहे.
तसेच ज्या ग्राहकांचा शेती हा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे अशा व्यक्तींना चार लाख रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांना एकूण कमाईच्या तिप्पट कर्ज मिळू शकणार आहे. खाजगी नोकरी तसेच व्यापार करणाऱ्या व्यक्तींना आयटीआर मध्ये दिलेल्या ग्रॉस टॅक्सेबल रक्कम किंवा निव्वळ चारपट कर्ज मिळू शकणार आहे.
लागतील ही कागदपत्रे
इलेक्ट्रिक कार साठी कर्ज घेण्याकरिता तुमच्याकडे मागील सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट असणे गरजेचे असून यासोबतच दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच ओळखपत्र आणि ऍड्रेस प्रूफ इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.