Expensive Scooters : भारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या सर्वात महागड्या स्कूटर, किंमत 10 लाखांपेक्षा जास्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Expensive Scooters : आजपर्यंत तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्यासाठी स्वस्त स्कूटर शोधत असता. तसेच इतर कोणीही बाजारात नवीन वाहन खरेदी करण्यासाठी गेले असता स्वस्त वाहन शोधतात. मात्र तुम्ही कधी भारतातील महागड्या स्कूटरबद्दल जाणून घेतले आहे का?

तुम्हीही आजपर्यंत भारतातील स्वस्त स्कूटरबद्दल जाणून घेतले असेल आणि तुम्हाला देशातील महागड्या स्कूटरबद्दल माहिती नसेल तर आज तुम्हाला महागड्या स्कूटरबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

bmw c400

भारतातील सर्वात महागड्या स्कूटरचे नाव bmw c400 आहे. ही देशातील सर्वात महागड्या स्कूटरपैकी एक आहे. या स्कूटरमध्ये कंपनीकडून 350cc इंजिन देण्यात येत आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे.

Keyway Sixties 300i

भारतातील सर्वात महागड्या दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या स्कूटरचे नाव Keyway Sixties 300i आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 3.3 लाख रुपये आहे. या स्कूटरमध्ये कंपनीकडून 278.8cc इंजिन देण्यात येत आहे. या स्कूटरमध्ये LED लाईट्स आणि LCD लाईट्स दोन्ही पाहायला मिळतील.

Keeway West 300i स्कूटर

Keeway West 300i ही स्कूटर देशातील तिसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वात महागडी स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये कंपनीकडून 278.8cc इंजिन देण्यात आले आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 3.3 लाख रुपये आहे.

Okinawa Okhi-90 Electric Scooter

देशातील चौथी सर्वात महागडी स्कूटर Okinawa Okhi-90 Electric स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.6kWh बॅटरी पॅक देण्यात येत आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 160 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.86 लाख रुपये आहे.

Aprilia SXR 160

Aprilia SXR 160 ही स्कूटर देखील सर्वात महागड्या स्कूटरपैकी एक आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.44 लाख रुपये आहे. तसेच स्कूटरमध्ये 160cc इंजिन देण्यात येत आहे. तसेच स्कूटरमध्ये धमाकेदार फीचर्स देखील देण्यात येतात.

Vespa SXL 150 स्कूटर

Vespa SXL 150 ही स्कूटर देखील महागडी स्कूटर म्हणून ओळखली जाते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.48 लाख रुपये आहे. तसेच Vespa SXL 150 या स्कूटरमध्ये 149.5cc इंजिन देण्यात येत आहे.